शुक्रवारी सामुहिक विवाह मेळावा...

गुरुदेव सेवा मंडळाच्या पुढाकारातून जवळगावात १० जोडप्यांचा शुक्रवारी सामुहिक विवाह मेळावा...



हिमायतनगर(वार्ताहर)संत तुकडोजी महाराजांच्या विचारसरनीतून प्रभावित झालेल्या गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्ते व गावकरी मंडळीनी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मूळ गावात दि.०२ मे शुक्रवारच्या शुभ मुहूर्तावर १० जोडप्यांचा सामुहिक विवाह मेळाव्याचे आयोजन कण्यात आले आहे. या मेळाव्यास अनेक राजकीय नेते मंडळी, मान्यवर नागरिक व नातेवाईक उपस्थित राहणार आहेत.  

महागाईच्या काळात अधिकच्या खर्चाला फाटा देऊन वेळ व पैश्याची बचात व्हावी. यातून गरीबातील गरिबांचे लग्न संपन्न व्हावे असा संदेश संत तुकडोजी महाराजांनी ग्राम गीतेतून दिला होता. याच काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी होत असून, याच पर्व काळात त्यांच्या सुविचार आचरणात आणत येथील गुरुदेव सेवा मंडळ व गावकऱ्याच्या वतीने सर्वधर्मीय भव्य सामुहिक विवाह मेळाव्याचे आयोजन केले आहे. विवाहाच्या तत्पूर्वी याचा विवाह मंडपात राष्ट्रीय प्रवचनकार ज्ञानेश्वर केसाले महाराज यांचे ग्रामगीतेवर प्रवचन होणार आहे. असा हा मंगल सोहळा पार पडून गावकरी व गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याची जय्यत तयारी केली आहे. या शुभप्रसंगी हजारोच्या संखेत नागरिकांनी उपस्थिती दर्शून वधू - वर दाम्पत्यांना शुभाशीर्वाद द्यावेत असे आवाहन गावकर्यांनी नांदेड न्युज लाइव्हच्या माध्यमातून केले आहे.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी