’महात्मा गांधी’ फंडा

उद्योगमंत्री नारायण राणेंच्या सभेला गर्दी व्हावी म्हणून कॉंग्रेस व राष्ट्रवादीचा ’महात्मा गांधी’ फंडा
[
नांदेड(प्रतिनिधी)माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ राज्याचे उद्योगमंत्री ना.नारायण राणे यांची उद्या (शुक्रवार) देगलूर येथे सभा होणार असून यासाठी गर्दी निर्माण करण्याची आव्हान युतीच्या घटक पक्षासमोर निर्माण झाले आहे.

कालच्या सभेत देगलूर शहरातील कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर ग्रामीण भागातून कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. येणारे लोक उन्हा तान्हात फुकट यायला तयार नाहीत. मोदींच्या सभेचा अपवाद वगळता अन्य सभेला जाण्यासाठी ७०० रुपये रोज व जेवण अशी सुविधा मागण्यात येत आहे . गर्दीसाठी ’महात्मा गांधी’ चे चित्र असलेली किमान एक नोट ५०० ची नोट द्यावी लागणार आहे. परंतु हा खर्च उमेदवाराच्या खर्चात घालता येत नसल्याने त्याची जबाबदारी नगरसेवकांव व अन्य लोकप्रतिनिधींवर टाकण्यात आल्याचे समजते आदर्श घोटाळ्यात अडकलेले माजी मुख्यमंत्री चव्हाण यांना कॉंग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने शेवटच्या क्षणी तिकीट दिले आहे. या प्रकरणावरून राज्यातील कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदारंाच्या उलटसूलट प्रश्‍नांना तोंड देता-देता नाकी नऊ येत असताना . अशात राष्ट्रीय स्तरावरील इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे या उमेदवारीवर सतत टीका करतांना दिसून येतात. थेट राहूल गांधी यांनाही दोषी ठरविले जात आहे. अशा बिकट परिस्थितीत अशोक चव्हाण यांना विजयी करण्यासाठी नांदेड लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस व राष्ट्रवादीला मतदारंाना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरावे लागत आहेत.

नारायण राणे एक आक्रमक नेते असून त्यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी काल सायंकाळी देगलूर मध्ये आमदार अंतापूरकर यांच्या निवासस्थानी बैठक झाली. बिलोली देगलूर हा खा. भास्करराव पाटील खतगावकर यांचा जुना विधानसभा मतदार संघ आहे व त्यांची गावही याच मतदार संघात येते.पण प्रचाराची यंत्रणा त्यांना न देता या बैठकीला अशोकरावांचे खास विश्वासू सहकारी आ. अमर राजूरकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवकांना समान ’रसद’ देण्यात आली आहे. ग्रामीण भागातून कार्यकर्ते आणण्यासाठी वाहन व दरडोई मानधनाची व्यवस्था त्यातून करण्यात येणार आहे. एवढे सारे करूनही नगरसेवक नाखुश दिसत होते. सभा यशस्वी करायची तर सढळ हाताने मदत करायला हवी होती अशी कुरकुर नगरसेवक करताना दिसत होते. कॉंग्रेसचे नगरसेवक राजूरकरांनी दिलेले अर्थसहाय्य अत्यंत कमी असल्याची टीका करीत होते. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व कॉंग्रेसचे पदाधिकारी राणेंच्या सभेला गर्दी कशी निर्माण करतात याकडे लक्ष लागून आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आ. अंतापूरकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील. ही सभा शुक्रवारी सायंकाळी मोेंढा मैदान येथे होणार आहे

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी