पर्यटकांची गैरसोय

सहस्रकुंड पर्यटन स्थळाचे काम रखडल्याने पर्यटकांची गैरसोय


हिमायतनगर(अनिल मादसवार) विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या सहस्रकुंड बाणगंगा धबधब्याचे विहंगम दृश्य रामायणकालीन इतिहासाची साक्ष देणारे आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना याचा अनुभव घेत येउन डोळ्याचे पारणे फिटावे म्हणून पर्यटन विकास महामंडळ कडून ६.५ शे कोटीच्या निधीतून मोठ्या प्रमाणात विकास कामाची सुरुवात गात दोन वर्षापूर्वी करण्यात आली मात्र सदरचे काम हे अत्यंत संत गतीने केले जात असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर - किनवट तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या इस्लापूर  गावापासून ४ कि.मी. अंतरावर पैनगंगा नदीच्या किनार्यावर असलेल्या महादेव मंदिराच्या पायथ्याशी १०० ते ९० फुटावरून कोसळणाऱ्या सहस्रकुंड धबधब्याचे निसर्गनिर्मित्त दृश्य आहे. हे दृश पाहण्यासाठी विदर्भ, मराठवाडा, आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून शेकडो पर्यटक हजेरी लावतात. मात्र या नदी पत्रात पाणी नसल्यामुळे सध्या धबधब्याची धार बंद पडली आहे. तरी सुद्धा या ठिकाणच्या कड्या कपार्यातून जाणार्या पाण्यामुळे दगडातून कश्या पद्दतीने रस्ता केलाय याचे रेखीव वास्तव चित्र पहावयास मिळत आहे. हे दृश्य देखील पाहणार्यांच्या डोळ्यांना मोहित करणारे आहे.

सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु असून, सुट्टीत मौज - मजा करण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र या ठिकाणी हव्या त्या प्रमाणात सोई - सुविधा उपलब्ध झाल्या नसल्याने येणार्यांना पिण्याच्या पाणी टंचाई बरोबर अन्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. मागील तीन वर्षापूर्वी पर्यटन विकास महामंडळाकडून ६.५ शे कोटीचा निधी मंजूर करून विकासाचा मास्टर प्लान बनविण्यात आला आहे. त्यातून पर्यटकांना निवार्याची सोय, ८० फुट उंच हवाई मनोरे, मंदिराचे बांधकाम, हिरवेगार गालीच्यानी सजलेले गार्डन, बसण्यासाठी आसन व्यवस्था, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय व पर्यटकांची सुरक्षितता आदींसह अन्य कामे होणे अपेक्षित होते. परंतु सदरचे काम करणाऱ्या गुत्तेदाराकडून पर्यटन विकासाचे काम अत्यंत संत गतीने केले जात असल्यामुळे भर उन्हाळ्यात पर्यटकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

एवढेच नव्हे तर या ठिकाणी येणाया पर्यटकांची सुरक्षितता सुद्धा धोक्यात आली आहे. कारण या ठिकाणी पोलिस चौकी नसल्यामुळे हौशे युवक - युवती नदी पत्रातील पाण्यात जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मागील दोन महिन्यापूर्वी आदिलाबाद येथील युवकांच्या मौज मजेत एकास आपला प्राण गमवावा लागला. हि बाब माहित असताना अद्याप या ठिकाणी केलाव सूचना फलक लावण्याव्यातिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अधून - मधून या ठिकाणी दुदैवी घटना घडत आहेत, यावर अवर घालण्यासाठी संबंधित प्रशासनाच्या वतीने तातडीने विकास कामे पूर्णत्वास नेउन पर्यटकांना सुरक्षेची हमी देणे गरजेचे असल्यचे मत काहींनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना सांगितले.

तरुणांचा धुडघूस ... महिला मुलींसह भाविकांची कुचंबना 

पर्यटन स्थळाचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या कुटुंबातील अनेक महिला मुलीना या ठिकाणी येणाऱ्या टवाळखोर युवकांमुळे अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही तरुण युवकांचे टोळके या ठिकाणी तर केवळ पार्टी करून पार्टन स्थळी येणाऱ्या मुली - महिलांची छेड काढण्यासाठी येत असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी अनेकदा अश्या तक्रारी मंदिर समितीच्या लोकांकडे व येथील व्यापार्यानाकडे झाली असून, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिस चौकी नाल्यामुळे या दारुड्यांचा नाहक त्रास भक्तांना सहन करावा लागत आहे. या बाबीची दाखल घेऊन पोलिस प्रशासनाने पर्यटक महिला -मुलींच्या सुरक्षा व होणार्या नुचीत घटना टाळण्यासाठी पोलिस चौकी उभारणे गरजेचे असल्याचे मत अनेक पर्यटक, व्यापारी व नागरिकांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना व्यक्त केले आहे.       

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी