मंदीरावर केली तुफान दगडफेक

जमावाने पांगरीत मंदीरावर केली तुफान दगडफेक ; साधू जखमी

नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)नांदेडपासून जवळच असलेल्या पांगरी या गावात एका 85 वर्षीय साधूला मंदीराची जमीन हडप करण्याच्या दुष्ट हेतूने मारहाण केल्याचा प्रकार होळीच्या दिवशी घडला. या घटनेला पोलिसांनी लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पाठीमागे पांगरी हे गाव आहे. या गावात वैष्णवी देवी मातेचे मंदीर आहे. हे देवस्थान जागृत आहे. या मंदीराचे अनेक भाविक आहेत. या मंदीराची काही एकर जागा मंदीराच्या आसपास व गावात आहे. मंदीराचे महंत साधू असून त्यांचे वय आज 85 वर्ष आहे. जोगींदर मुनी असे त्यांचे नाव आहे. या वैष्णवी देवी मंदीरात दर आठवड्याला महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

सर्वत्र होळी निमित्त आपसातील वैरभाव विसरावेत आणि दोन जमातीमध्ये प्रेमभाव वाढावा यासाठी अनेक स्तरावर नेहमी प्रयत्न सुरू असतात. होळी हा सण मागील वैरभाव विसरून नवीन सुरूवात करण्यासाठी असतो. पण याच दिवशी या मंदीरात आपल्या कोंबड्या घुसवून काही जणांनी त्या मंदीरात लावलेल्या शेणाच्या गवऱ्या उकरल्या.कोंबड्या तशा करणारच. पण या कोंबड्यांना मंदीराच्या परिसरात जाणार नाहीत याची दक्षता घेण्याची जबाबदारी कोंबडी मालकांची असताना त्यांनी मात्र तसा काहीच प्रयत्न केला नाही आणि ऐन होळीच्या दिवशी सकाळी 8 वाजता कोंबडी मालक व त्याच्या काही सहकाऱ्यांनी मंदीरावर तुफान दगडफेक केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. तर त्यांनी साधू जोगींदर मुनी यांना अत्यंत घाणेरड्या शब्दात शिव्या दिल्या. यामुळे हिंदी भाषीक असलेल्या साधूंना या शिव्या कळल्या नाहीत.आरडाओरड करत झालेल्या या हल्ल्यात साधूंच्या पायाला व पाठीला गंभीर मार लागला.

शिवसेनेचे नगरसेवक दिपकसिंह रावत यांनी रूग्णालयात जावून साधूंच्या तब्येतीची विचारणा केली.ही घटना कळताच पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया,सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज देशमुख हे त्वरीत घटनास्थळी धावले आणि त्यांनी त्या ठिकाणी मंदीरावर हल्ला करणाऱ्या शेख अहेमद शेख महेमूब,शेख अकबर शेख अहेमद,शेख पीरसाब शेख महेमूब,शेख बशीर शेख पीरसाब, शेख करीम शेख अहेमद,शेखबाबा शेख अहेमद,शेख नजीर शेख पाशा या लोकांना अटक केली. या सात जणांवर साधू जोगींदर मुनी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदीरात झालेली दगडफेक कळताच काही हिंदू मंडळी पण तेथे जमली होती.त्यापैकी तीन जणांवर सुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल 17 मार्च रोजी सकाळी घडलेली घटना पोलिसांनी संध्याकाळच्या प्रेसनोटमध्ये दिली नाही. तसेच आज 18 मार्च रोजी सुध्दा निघणाऱ्या प्रेसनोटमध्ये ही माहिती देण्यात आली नाही. या पकडलेल्या सात जणांना नांदेड ग्रामीण पोलिसांनी 18 मार्च रोजी न्यायालयासमक्ष हजर केले होते आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत घेण्याची विनंती केली. त्यानुसार न्यायालयाने ती विनंती मान्य केली.

पांगरी या वेैष्णवी देवी मंदीराची जागा आता कोटयावधी रूपयांची झाल्याने या जमीनीवर बऱ्याच लोकांचा डोळा आहे. आणि त्यातील काही मंडळी अशा प्रकारे त्रास देवून मला तेथून (पळवून) सुंबाल्या करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे या मंदीराचे महंत 85 वर्षीय जोगींदर मुनी यांनी नांदेड न्यूज लाइव्हशि बोलताना सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी