पत्रकारास जीवे मारण्याची धमकी

दारूची अवैद्य विक्री करणार्याकडून पत्रकारास जीवे मारण्याची धमकी

हिमायतनगर(वार्ताहर)अवैद्य दारू विक्रीची बातमी प्रकाशित केल्याचा राग मनात धरून पित्त खवलेल्या अवैद्य देशी दारू विक्रेत्याने " तू गावात येवून दाखव तुझे हाथ पाय तोडून हातात देतो " असे धमकी वजा वक्तव्य दूरध्वनीवरून मौजे सिरंजणी येथील पत्रकारास करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दि.१८ रोजी घडली. या घटनेचा पत्रकार संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करून संबंधित विक्रेत्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मौजे सिरंजणी येथील " दैनिक उद्याचा मराठवाडा " चे पत्रकार धम्मपाल मुनेश्वर यांनी येथील "अवैद्य देशी दारूची खुलेआम विक्री " या मथळ्याखाली दि.२७ नोव्हेंबर २०१३ रोजीच्या अंकात बातमी प्रकाशित केली होती. यचा राग मनात धरून अवैद्य देशी दारू विक्रेता आनंद मुनेश्वर, नामदेव मुनेश्वर यांनी सदर वार्ताहरास दि.१८ रोजी दूरध्वनीवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद येथील वार्ताहर धम्मपाल मुनेश्वर यांनी हिमायतनगर पोलिस स्थानकात दिली आहे.

या घटनेचा हिमायतनगर येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. तसेच सदर आरोपी व अवैद्य देशी दारू विक्रेत्याकडून वारंवार पत्रकारास धमकी देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कार्यवाही करा,आणि पत्रकारास संरक्षण द्या अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग गाडगे, कार्याध्यक्ष प्रेमकुमार धर्माधिकारी, उपाध्यक्ष दत्ता शिराणे, परमेश्वर शिंदे, सचिव अनिल मादसवार, सहसचिव साईनाथ धोबे, कोषाध्यक्ष अनिल भोरे, सहकोषाध्यक्ष फाहद खान, संघटक कानबा पोपलवार, सल्लागार प्रकाश जैन, चांदराव वानखेडे, दिलीप शिंदे, संजय कवडे, धम्मपाल मुनेश्वर, विष्णू जाधव, ज्ञानेश्वर गोडसेलवार, प्रेस फोरमचे शे.इस्माईल आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी