डी.बीं.साठी सरसावले!

असंतुष्ट राम पाटील डी.बीं.साठी सरसावले!

नांदेड(रमेश पांडे)डी.बी.पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करणार्‍यांच्या यादीत अग्रेसर असलेले व लोकसभेसाठी इच्छूक उमेदवार म्हणून दावा ठोकणारे राम पाटील रातोळीकर अखेर डी.बीं.च्या तंबूत दाखल झाले असून त्यांची यंत्रणाही निवडणुकीच्या कामाला लागल्याची माहिती मिळाल्याने डी.बी.विरोधी लाट हळूहळू थंड होत असल्याचे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या वर्षभरापासून राम पाटीलांनी वेगवेगळ्या परीने ङ्गिल्डींग लावली होती. इच्छूकांच्या स्पर्धेत अग्रणी म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होती. परंतु ऐनवेळी खा. गोपीनाथराव मुंडे यांनी डी.बी.पाटील यांना उमेदवारी देवून इच्छूकांची तोंडे बंद केली. डी.बीं.ची उमेदवारी अचानक जाहीर करून पक्षश्रेष्ठीनी धमाका उडवून दिल्याने राम पाटील रातोळीकर, डॉ. धनाजीराव देशमुख, डॉ.अजित गोपछडे यांनी या उमेदवारीला विरोध करून अंतर्गत कलहाला ङ्गोडणी दिली. डॉ.धनाजीरावांनी आपले वर्चस्व दाखविण्यासाठी महानगर शहर कार्यकारिणी जाहीर करून या ङ्गोडणीत आणखी तेल ओतण्याचे काम केले. याशिवाय भाजपाच्या नुकत्याच झालेल्या निवडणूक विषयक बैठकीत राम पाटील व डॉ.देशमुख गैरहजर राहिले आणि त्यांनी डी.बीं.च्या उमेदवारीला उघड विरोध दर्शविला. भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले असतानाच गेल्या दोन दिवसांपासून घडलेल्या नाट्यमय घडामोडीत असंतुष्ट मानले जाणारे राम पाटील मात्र डी.बीं.च्या तंबुत आले असून त्यांनी डी.बीं.साठी काम करण्याची तयारी दर्शविली आहे. गारपीटग्रस्त भागाचा आज दौरा

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड गारपीटीचा तडाखा बसलेल्या भागाचा डी.बी.पाटील शनिवारी सकाळपासून दौरा करणार आहेत. त्यांच्यासोबत राम पाटील रातोळीकर व त्यांचे समर्थक जाणार असून राम पाटीलांची समजूत काढण्यात डी.बी.यशस्वी ठरल्यामुळे डॉ.धनाजीराव व अन्य असंतुष्टही मोदी मिशनसाठी लवकरच त्यांच्या गळाला लागतील, असे मानले जाते.

आजच्या बैठकीकडे नजरा

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा भारतीय जनता पक्षाची शनिवारी बैठक होणार आहे. या बैठकीला उमेदवार डी.बी.पाटील, राम पाटील रातोळीकर यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहेत. निवडणूक प्रचाराची दिशा या बैठकीत ठरवली जाणार असली तरी डॉ. धनाजीराव देशमुख व डॉ.अजित गोपछडे बैठकीला उपस्थिती राहणार की नाही याकडे मात्र भाजपप्रेमींचे लक्ष लागून आहे.

आम्ही एकसंघच - डी.बी.

उमेदवारीसाठी अनेक इच्छूक असले तरी पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम असतो. माझ्या उमेदवारीमुळे पक्षातील काही नेते समाधानी नाहीत, असे म्हणणे चुकीचे आहे. राम पाटील यांच्यासह सर्वच नेत्यांनी आपल्या प्रचारासाठी होकार दिला असून आम्ही एकसंघच राहणार आहोत, अशी प्रतिक्रिया डी.बी.पाटील यांनी दिली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी