चंदन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात

चंदन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात ...पावणेतीन लाखाचा मुद्देमालासह तीन आरोपी ताब्यात

नांदेड(अनिल मादसवार)आर्धापुर शिवारात पाल टाकून चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने चंदनाची ओलसर खोडांचा साठा करणाऱ्या तिघांना पंकज देशमुख यांचा पथकाने रंगेहात पकडले आहे.

अर्धापूर शिवारात मंगळवारी रात्री ६ वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांचा पथक अवैध्य धंधे वाल्यांना पकडून गुन्हे दाखल करण्याच्या कामासाठी पेट्रोलिंग वर गेले असता, चंदन तस्करांची फिरस्ती टोळी कार्यरत असल्याचे समजले. या गुप्त माहितीवरून अर्धापूर आय. टी.आय.च्या समोरील बाजूस फ़यूम भाई यांच्या रिकाम्या प्लोतिंग मध्ये पाल टाकून असलेल्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी सदर ठिकाणी सात ते आठ जन उघड्यावर बसून चंदनाचे लाकडे सालीत असल्याचे दिसून आले.त्यापैकी काहींनी पोलिसांना बघताच धूम ठोकली. त्यांचा पाठलाग केला परंतु पोलिसांनी अन्न हनमंता गायकवाड वय ५८ वर्ष रा.शिवाजी नगर मानवत जी.परभणी, गोविंद अण्णा गायकवाड वय २७ वर्ष, शेख युनुस शेख बशीर वय ३५ वर्ष रा.कर्मवीर नगर, ज्ञानमाता हायस्कूल जवळ नांदेड, या तिघांना पकडण्यात यश आले. तर पलायन केलेल्या एका इसमाचे नाव इस्ताक रजाक पठाण रा.सातेफळ ता.पूर्णा, जी.परभणी असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून खोड, धीपल्या, चंदनाच्या झाडाचे तुकडे २५० कि.ग्रेम वजनाचे असे मिळून अंदाजे ३ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल पिवळ्या नायलॉन खताच्या पिशवीत भरून आढळून आले आहे. तसेच तीन लोखंडी वाक्सा ज्यास एक फुट लांबीचे दांडे, दांडे नसलेल्या धारधार दोन कुऱ्हाडी,वाकस असे साहित्य जप्त केले आहे. या घटनेचा पंचनामा करण्यात येवून वरील चंदन तस्कर आरोपींवर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१, ४२ व महाराष्ट्र वृक्ष तोड प्रतिबंध कायदा १९६४ चे कलम ३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कार्यवाहीत सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अर्धापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे, सपोनि व्ही.आर, रोडे, सपोनि श्री.प्रकाश अवचार, ना.पो.का.मुधोळकर, पांढरे, प्रकाश कडदनवार, गणेश जाधव, आनंद भाडेकर, यांचा समावेश आहे. मागील अनेक महिन्यापासून जिल्ह्यातील बहुतांश भागात चंदन तस्करी होत असल्याच्या नोंदी पोलिस दप्तरी झाल्या होत्या. आज झालेल्या या कार्यवाहीमुळे चंदन तस्कराची टोळी कार्यरत असल्याचे उघड झाले असून, त्यांची चौकशी केल्यास जिल्ह्यातील अनेक तालुक्यात होत असलेल्या चंदनाच्या झाडाच्या तस्कराचे धागे ढोरे लागण्याची शक्यता बळावली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी