भयमुक्त व निषपक्ष निवडणुक व्हावी

भयमुक्त व निषपक्ष निवडणुक व्हावी म्हणून नांदेड पोलीसदल सज्ज- परमजितसिंह दहीया

नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)येत्या लोकसभा निवडणुकीसाठी नांदेड पोलीस दल सज्ज असून जनतेने भयरुप वातावरणात मतदान करावे असे आवाहन पोलीस अधिक्षक परमजितसिंह गहीया यानी आज पत्रकार परिषदेत केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अंदाजीत 2736 मतदान केंद्रासाठी एक आराखाडा तयार केला असून जिल्ह्यातील एकूण पोलीस बळाच्या 80 टक्के पोलीस बळ निवडणुकी प्रक्रियेत काम करेल. 20 टक्के पोलीस बळ हे दैनंदिन अत्याआवश्यक कामकाजासाठी तैनात राहील, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पोलीसांनी व प्रशासनाने आदर्श आचारसंहितेचे कटाक्षाने पालन हेाईल यावर नजर ठेवली तर मतदान टक्के वारी वाढेल म्हणून पोलीस बळातील प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचारी हा जनतेत काम करत असतांना त्याच्यासाठी सुध्दा एक आचारसहिता जारी करण्यात आली आहे.

मागील निवडणुका संदर्भाने दाखल झालेल्या 191 गुन्ह्यातील 150 लोकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्या विरुध्द प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जाणार आहे. जिल्ह्यात806 परवानाधारक शस्त्राची संख्या असून निवडणुक काळात ते सर्व सशस्त्र जमा करुन घेण्यात येतील. अवैध दारु विक्रीवर कडक कार्यवाही केली जाईल. निवडणुक काळातील संमन्स व वारंट तामीलीवर जास्त भर दिला जाईल. त्यातील निवडणुक आचार सहिता जारी झाल्यानंतर 324 गैरजमानती वारंट तामील करण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले. निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार किती लोकाविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई केली त्यापेक्षा ती कीती दर्जेदार होती यावर भर दिला जाणार आहे. मागे काही दिवसापूर्वी पकडलेल्या 400 पेक्षा जास्त तलवारीचा उल्लेख करुन पोलीस अधिक्षक परमजितसिंह गहीया म्हणाले की यापुढे हे शस्त्र कोठून येतात हे शेाधण्यावर आम्ही भर देणार आहोत. 

निवडणुक आचार संहिता दरम्यान एका विधानसभा क्षेत्रात 3 भरारी पथके असतील त्यात एक कार्यकारी दंडाधिकारी , फोटोग्रॅफव व पोलीस कर्मचारी असतील, पोलीस ठाणे स्तरावर अशाच पध्दतीचे एक स्थिर पथक असेल. ते निवडणुक आचार संहिता योग्य रितीने पाळली जावी यावर बारकाईने लक्ष ठेवेल. जिल्ह्यात 2009 च्या निवडणुकीमध्ये 171 मतदान केंद्र संवेदनशील या कक्षेत होते. यंदा ही संवेदनशिलता बदलणार आहे काय यावर अभ्यास सुरु असल्याचे सांगण्यात आले.

निवडणुकीतील पैशाचा वाढता वापर यावर बोलताना पोलीसअधिक्षक परमजितसिंह दहीया म्हणाले मिळालेले पैसे हे एखाद्या उमेदवारांशी संबंधित गाडीत असेल, ज्या गाडीला निवडणुकीतील वापराची परवानगी आहे, अशा पैशाविरुध्द नक्कीच गुन्हा दाखल हेाईल इतर प्रकारामध्ये पैसे कोठून आणले ते सांगितल्यावर त्या विरुध्द काही करता येत नाही. तसेच आयकर विभागाशी समन्वय राखून पैशांसी संबंधित कारवाई केली जाईल असे सांगितले. या पत्रकार परिषदेत अपर पोलीस अधिक्षक शाम घुगे, गृहपोलीस उपअधिक्षक शामकांत तारे, पोलीस निरीक्षक श्रीधर पवार यांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी