लोहा-कंधार तालुक्यातील नुकसान कोटीच्या घरात

लोहा-कंधार तालुक्यातील साडेचार हजार हेक्टर क्षेत्रातील पिके झाली आडवी; नुकसान कोटीच्या घरात

*लोहा १५ व कंधार ६६ गावात हाहाकार.
*अर्ध्या फुटावर साचला गाराचा थर.
*पशु,पक्षी ठार;शंभरावर महिला-पुरुष जखमी. 


लोहा(ज्ञानोबा नागरगोजे)गारपीट, सोसाट्याचे वादळ तसेच मुसळधार पावसाच्या थैमानाचा फटका प्रचंड प्रमाणात लोहा-व कंधार तालुक्याला बसला. सतत एक आठवड्यापासून चाललेल्या या थैमानात रब्बीची पिके पूर्णतः जमीन दोस्त झाली आहेत.फळ बागाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.तर ग्रामीण भागासह शहरातील घरावरील टीन पत्रे उडून गेल्याने घराचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे.गत ४० वर्षात पहिल्यांदाच एवढी भयानक बर्फ वृष्टी झाली आहे.जमिनीवर जवळपास अर्धा फुट वर बर्फाचा थर निर्माण झाला. त्यामुळे जम्मू काश्मीरमधील बर्फ वृस्टीचा अनुभव लोहा व कंधार तालुक्यातील नागरिकांनी अनुभवला.मात्र तुफान बर्फ वृस्टीमुळे लोहा व कंधार या दोन्ही तालुक्यातील जमिनीचा कस निच्छितच कमी झाला आहे.

लोहा -कंधार तालुक्याची ऒळख प्रामुख्याने डोंगराळ तालुका म्हणून आहे.मात्र या वर्षी प्रथमच लीम्बोटी धरणाचे पाणी शेतीला मिळाल्याने यंदा रब्बीचे क्षेत्र प्रचंड वाढले.तर हाती पिक आले असतानाच निसर्ग लोहा व कंधार तालुक्यावर कोपला गारपीट,वादळी वारा व जोरदार पाऊस यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले .गहू अडवा झाला तर हरभरा,व कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले लोहा तालुक्यातील जवळपास १५ गवात तुफान गारपीट तसेच कंधार तालुक्यात जवळपास ६६ गावात गारपीट झाली त्यामध्ये शेकडोवर पशु,पक्षी ठार झाले.तर शंभरावर महिला-पुरुष जखमी झाले वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडून तसेच घराच्या भिंती पडून मोठे नुकसान झाले आहे.गाराच्या भयाणक्तेचा तडाका पिकासह पशु,पक्षी यांना मोठ्या प्रमाणात बसला.यंदा आंब्याच्या झाडाला विक्रमी फळधारणा झाली होती.मात्र वादळी वार्यामुळे सर्व फळांचा सफडा साफ झाला..कंधार तालुक्यातील बिजेवाडी,मजरे धर्मापुरी,बहाद्दर्पुरा ,बाळांतवाडी,घोडज, घोडजतांडा, आनंदवाडी, बाबुलगाव, गंगान्बिड, उमरज, पाताळगंगा,बोरी(खु),बाचोटी,चिंचोली,गोगदरी,चौकी धरमापुरी, मानसपुरी, लालवाडी, जंगमवाडी, मडळी, रुई, कल्हळी, सावरगाव(नि.),फुलवळ, कंधारे वाडी, गुंडेवाडी, अंबुलगा,ब्रह्मवाडी, टोकवाडी, पिंपळाचीवाडी, शेकापूर, तळ्याचीवाडी,संगमवाडी,गवूळ, बारूळ, वरवंट,काटकळंबा, येलूर, राहटी, कोटबाझार, नवरंगपुरा, गुलाबवाडी, इमाम वाडी, पेठवडज,देवयाची वाडी ,मंग्णाळी, शिरशी(बु), शिरशी (खु), बोरी(बु),कळका, वाखरड, नावद्याची वाडी, गोनार,खंडगाव(ह), जाकापूर, मसलगा, येलूर, नार्नाळी , कौठा, कौठावाडी, शिरूर, रौतखेडा चौकी,महाकाय, धानोरा कौठा,चिखली,ऒराळ ,आदि ६६ तर लोहा तालुक्यातील अस्टूर,रिसनगाव, हरणवाडी, सावरगाव, हाडोळी. गोळेगाव ,मुरंबी,रिसंगाव,केशुतांडा,लाव्हराळ, सह जवळपास १५ अशी एकूण ८२ गावे या महासंकटामध्ये सापडली आहेत.आतापर्यंत झालेल्या नुकसानी मध्ये जवळपास दीड हजार हेक्टर हरभरा ,दीड हजार हेक्टर गहू व जवळपास दीड हजार हेक्टर क्षेत्रावर उस,हळद, भाजीपाला,मक्का,करडी,आंबे,असे दोन्ही तालुक्यात जवळपास साडेचार हजार हेक्टर वर नुकसान झाले आहे. नुकसानीचा आकडा कोटी च्या वर जाण्याची शक्यता प्रशासकीय अधिकार्यांनी व्यक्त केली आहे.गारपीट ग्रस्त तसेच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या गावाचा सर्वे करण्याचे काम महसूल प्रशासनाकडून युद्ध पातळीवर चालू आहे.हिरवा गार झालेल्या कंधार व लोहा तालुक्याचे एक आठवड्याच्या काळात होत्याचे नव्हते झाले.जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तर प्रचंड प्रमाणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी, आजी आमदारासह आजी,माजी मंत्री तसेच विविध पक्ष्याचे पदाधिकारी नुकसानग्रस्त भागात पोहचले आहेत. तर कंधार तसेच लोह्याचे तहसीलदार,उपविभागीय अधिकारी ,तलाठी,कृषी सहायक,ग्रामसेवक सर्वे करण्याकामी सरसावले आहेत.

पालकमंत्री सावंत यांनी अनुभवला गाराचा `मार`

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री डी..पी.सावंत हे दि.८ मार्च रोजी लोहा तालुक्यातील अस्टूर व रिसनगाव येथील गारपीट ग्रस्त भागाची पाहणी करून परत येत असताना माळाकोळी नजीक अचानक पावसासह गाराचे आगमन झाल्याने पालकमंत्री तत्काळ गाडीमध्ये बसले तर गाराचा मार कसा असतो याचा अनुभव पालक मंत्र्याने जवळून अनुभवला.तर गार पीटीचा थरार तसेच पावसाचे आक्रमक रूप पालक मंत्री यांनी गाडी थांबवून काही काळ पाहीले.

काढणीला आलेला गहू तसेच हरभरा पाणी तसेच गाराच्या भक्षस्थानी सापडला आहे सतत च्या पावसामुळे रब्बी चे पिक पूर्णतः हातून गेले असून मोठे नुकसान झाले आहे- केरबा केंद्रे, शेतकरी,गोलेगाव,ता.लोहा

शेतीमध्ये जवळपास अर्धा फुट गाराचा थर साचल्याने जमिनीचा कस कमी होऊन उत्पन्न वाढीवर विपरीत परिणाम होणार आहे.तर गाराच्या माराने पशु सह कोंबड्याचे बळी गेले आहेत.गत चाळीस वर्षात पहिल्यांदाच गारपीट ची एवढी भयावहता दिसून आली- माधवराव नागरगोजे,शेतकरी,ब्रह्मवाडी ता.कंधार.

हजारो रुपये खर्च करून हाती आलेले पिक डोळ्या समोरून निसर्गाने हिरावून नेले यात घरासह शेती तसेच पशु,पक्षी व मानवाला देखील मोठी हानी पोहचवली आहे तर माझ्या सारख्या अल्प भूधारकांची मात्र मोठी गोची झाली आहे- संतोष चव्हाण , गणा तांडा ता. लोहा.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी