कब्बडी

श्री परमेश्वर यात्रेच्या कब्बडी स्पर्धेत बिरसा मुंडा क्रीडा संघ अव्वल


हिमायतनगर(अनिल मादसवार)वाढोण्याचे जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर यात्रा महोत्सवात विवीध खेळ, शालेय स्पर्धा, आयोजीत करण्यात आल्या असुन, स्पर्धांना ग्रामीण परीसरातील खेळाडुंसह नागरीकांचा भरपुर प्रतीसाद मिळत आहे. स्पर्धा अंतीम टप्यात आल्या असुन, दिनांक 09 व 10 रोजी संपन्न झालेल्या राष्ट्रीय खेळ कब्बडी मद्ये हिमायतनगर येथील जय बिरसा मुंडा क्रीडा संघाने विजयश्री प्राप्त केली आहे. आ.माधवराव पाटील जवळगांवकरांनी जाहीर केलेल्या 7001 रुपयाचे प्रथम क्रमांकाचे पारीतोषीक मंदिर समीतीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते देण्यात आले आहे.

भारतीय खेळात प्रामुख्याने महत्व असलेल्या कब्बडी स्पर्धा महाशिवरात्र यात्रेत जवळपास 2 दिवस चालल्या. यात हदगांव, हिमायतनगर, किनवट , माहुर, गोंडजेवली तालुक्यातील एकुन 16 क्रीडा संघानी सहभाग नोंदवीला होता. दि.09 रविवारी दुपारी 2 वाजल्यापासुन सुरु झालेली कब्बी स्पर्धा रात्री उशीरापर्यंन्त प्रकाश झोतात चालली. परंतु फायनल राऊंड होण्याअगोदर वादळी वा-यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे होऊ शकले नाही. त्यामुळे दि.10 सोमवारी या स्पर्धेचा अंतीम सामना राजा भगीरथ विदयालयाच्या प्रांगणात खेळण्यात आला. जय बिरसा क्रीडा संघ हिमायतनगर जय जगदंबा क्रीडा संघ डोडर्णा यां दोघांच्या तुल्यबळ लढतीत संपन्न झाला. 

त्यात हिमायतनगर तालुक्यातील आश्रम शाळेतील विदयार्थ्यांचा ज बिरसा मुंडा संघाने अव्वल क्रमांकाची बाजी मारली विजयी संघास 7001/- रुपयाचे बक्षीस परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, तत्कालीन तहसिलदार नारायण पैलवाड, लक्ष्मण शक्करगे, आनंता देवकते, यांच्या हस्ते देण्यात आले. दुसर्‍या क्रमांकाचे पारीतोषीक रुपये 5001/- डोडरणा येथील जय जगदंबा क्रीडा संघास देण्यात आले. तिसरा क्रमांकाचे पारितोषीक रुपये 3501/- बक्षीस जय सेवालाल क्रीडा संघ पवना तांडा, चौथा क्रमांकाचे 2501/- रुपयाचे बक्षीस रामबापु क्रीडा संघ आमदरी यास देण्यात आले. यावेळी कब्बडीचे पंच म्हणुन बी.आर.पवार, के.बी.शन्नेवाड, सोनबाराव राऊत, क्रीडा समीतीचे अध्यक्ष ऍड दिलीप राठोड, ए.एस.शेवडकर, परशुराम राठोड, प्रभाकर हातमोडे, प्रकाश साबळकर, रामु नरवाडे, नामदेव चव्हाण, प्रभाकर मुधोळकर, हनुसिंग ठाकूर, प्रकाश जैन, सुनील  सुवर्णकार, अशोक अनगुलवार, बाबुराव बोड्डेवार , बबलु काळे, हाणुसींग ठाकुर, प्रकाश जैन, सुनील सुवर्णकार, अनिल भोरे, धम्मपाल मुनेश्वर,व त्यांंचे सहकारी, व परमेश्वर ट्रस्टचे सदस्य, क्रीडा प्रेमी नागरीक व हजारों खेळाडु प्रेमी नागरीक उपस्थीत होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी