चव्हाणांना काँग्रेसची उमेदवारी

अशोक चव्हाणांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर

नवी दिल्ली(खास प्रतिनिधी)नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेड मधून उमेदवारी जाहीर करून काँग्रेस पक्ष श्रेष्टीने विरोधकांना मिरीन्डाचा झटका दिला आहे. उद्या अशोक चव्हाण हे हजारो कार्यकर्त्यांच्या शक्ती प्रदर्शनात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून नांदेडमधून कोणाला उमेदवारी द्यावी याची जोरदार चर्चा सुरू होती. पुण्यातून सुरेश कलमाडी यांचे तिकिट कापण्यात आल्याने अशोक चव्हाणांना उमेदवारी नाकारली जाईल अशी स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान विद्यमान खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी निवडणुकीतून माघार घेत अशोक चव्हाण यांच्यासाठी वाट मोकळी करून दिली होती. त्यानंतर नांदेड मधून अशोक चव्हाण किंवा त्यांच्या सुविद्ध पत्नी अमिता चव्हाण यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. तर दि.२५ रोजी अमिता चव्हाण व डी.पी.सावंत यांच्या नवे नामांकन दाखल केले होते. त्यानंतर सायंकाळी पक्ष श्रेष्टीने सर्व संभ्रम दूर करत अखेर अशोक चव्हाण यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण हे पुनश्च राजकारणात सक्रिय होणार असून, या संधीचा फायदा ते कश्या पद्धतीने घेतील हे आगामी काळात दिसून येणार आहे.

पक्षश्रेष्टींचा निर्णय मान्य - चव्हाण

नांदेड(प्रतिनिधी)नांदेड लोकसभा मतदार संघातून अत्यंत निर्णायक क्षणी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्‍वास टाकला आणि उमेदवारी जाहीर केली. मतदारांच्या विश्‍वासावर आणि विकास कामाला प्राधान्य देत आपण मतदारां समोर सामोरे जाऊ अशी प्रतिक्रिया अशोकराव चव्हाण यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना व्यक्त केली. २५ वर्षापूर्वी आपण निवडणूक लढवली होती. आणि आमचे चव्हाण घराणे नेहमीच कॉंगेसशी एकनिष्ठ राहिले आहे. माझी उमेदवारी हा मी त्याचाच एक सन्मान मानतो असेही त्यांनी म्हटले आहे.त्यांच्या उमेदवारी मुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, अनेकांनी फाटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी