गारपिटीचा ५ वा बळी

जिल्ह्यात गारपिटीचा ५ वा बळी
लांजीच्या तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास

नांदेड(प्रतिनिधी)माहूर तालुक्यातील लांजी येथील अवघ्या २८ वर्षांच्या कर्जबाजारी आदिवासी शेतकऱ्यांने काल दि.१९ रोजी आपल्या घराच्या नाटीला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याचे नाव अनिल प्रेमसिंग आडे असे आहे.

आपल्या आईच्या नावावर असलेल्या ३ एकर जमिनीवर अनिल आडे हा तरून शेतकरी शेजारच्या शेतकऱ्याकडून पाणी घेऊन हरभरा पेरला होता परंतु गारपीट आणि अवकाळे पावसाने सर्व पिक हातचे गेले होते.यामुळे बँकेचे काढलेले ३५ हजार रुपये कर्ज कसे फेडायचे आणि आणि खाजगी सावकाराचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत तो होता.दोन भावांचे लग्न आणि लहान मुले व पत्नी या सर्वांची जबाबदारी त्याच्यावर होती.पण कष्ट करूनही काहीच चंगले होत नसल्याने तो निर्श झाला होता काल दि.१६ मार्च रोजी आई व भाऊ शेतात गेलेले असताना व पत्नी माहेरी गेलेली असताना दुपारी स्वत:च्या राहत्या घरी त्याने नाटीला साडी बंधून गळफास घेतला. माहूर पोलिसांनी घटनास्थली पोचून पंचनामा केला असून त्याचे शवविच्छेदन माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात करून करून पार्थिव नातेवाईकांना सोपविले आहे हा गारपिटीचा जिल्ह्यातील पाचवा बळी आहे. या आधी कंधार लोहा तालुक्यात प्रत्येकी एक आणि हदगाव- किनवट तालुक्यात प्रत्येकी एक या प्रमाणे चार शेतकरी आत्महत्या करून मरण पावले आहेत.​

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी