`निवडणूक विशेषांक`

लोकराज्यचा `निवडणूक विशेषांक` प्रकाशित

नांदेड(अनिल मादसवार)सोळाव्या लोकसभेसाठी निवडणूक तारखांची घोषणा झाली आहे. राज्यातील 48 जागांसाठी दि.10, 17 व 24 एप्रिल 2014 रोजी तीन टप्प्यात मतदान होत आहे. या आनुषंगाने मतदानाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण होऊन मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी लोकराज्यचा मार्च-एप्रिल महिन्याचा अंक ‘निवडणूक विशेषांक’ म्हणून प्रकाशित करण्यात आला आहे. लोकशाही प्रक्रियेत मतदानाचे महत्त्व अधोरेखित करणारा आणि निवडणूक विषयक सर्व शंकांचे निरसन करणारा असे या अंकाचे स्वरुप आहे.

निवडणूक प्रक्रियेला लोकशाहीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. या प्रक्रियेला सशक्त व पारदर्शक बनविण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत कोणकोणते प्रयत्न केले जात आहेत याचा सविस्तर आढावा अंकात आहे. तसेच मतदार नोंदणीसाठी यशस्वीपणे राबविलेल्या ‘स्वीप’ प्रणालीची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय आदर्श आचारसंहिता, मतदार शिक्षण आणि जागृती, निवडणूक खर्च नियंत्रण, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, संसदीय लोकशाहीचा प्रवास, निवडणुकांचे प्रकार, निवडणुकीचा इतिहास इ. विषयावर तज्ज्ञांचे लेख अंकात समाविष्ट करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील मतदारसंघनिहाय आकडेवारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी असणारे राज्य निवडणूक आयोग याबद्दलची माहिती हेदेखील अंकाचे वैशिष्ट्य आहे. सर्वसामान्य मतदाराच्या मनात असणारे निवडणूक या विषयाबद्दलचे कुतुहल आणि शंका दूर करणारा हा अंक संग्राह्य असाच आहे. अंकाची किंमत 10 रुपये असून अंक सर्वत्र स्टॉलवर उपलब्ध आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी