आचारसंहितेत राजकीय नेत्यांची बैनर बाजी..

आचारसंहिता लागून २४ तास उलटले तरी राजकीय नेत्यांचे होर्डिंग जैसे थेच...
हा आचार संहितेचा भंग नव्हे काय..? जनतेचा सवाल

हिमायतनगर(वार्ताहर)आगामी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून,त्यानंतर लगेच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. परंतु यास २४ तास उलटले असताना हिमायतनगर येथील महाशिवरात्री यात्रेत लावण्यात आलेले राजकीय नेते व सामाजिक संघटनांचे होर्डिंग अजूनही जैसे थेच आहेत. त्यामुळे सुजन मतदार बंधवातून हा आचार संहितेचा भंग नव्हे काय..? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकाराकडे महसूल व पोलिस खात्याने लक्ष देवून कार्यवाही करावी अशी रास्त अपेक्षा व्यक्त होत आहे.

निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषीत झाल्याच्या वेळेपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आल्याच्या तारखेपासून शासकीय मालमत्तेच्या विरुपनास प्रतिबंध केले आहे. महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, सर्व नगरपरिषदा, ग्रामपंचायती, महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी, बीएसएनएल तसेच सर्व शासकीय, निमशासकीय विभागाच्या मालकीच्या मालमत्तेवर करण्यात आलेली राजकीय स्वरुपाचे तसेच मतदारास आवाहन करणारे सर्व प्रकारचे लिखाण तात्काळ पुसून टाकण्यात यावे. राजकीय पक्षाचे तसेच राजकीय व्यक्तीच्या नावे लावण्यात आलेले फलक, कापडी बॅनर्स, पोर्स्टस इत्यादी निवडणूक कार्यक्रम व आचारसंहिता जाहीर होताच तात्काळ काढून टाकण्यात यावेत. जर अशा प्रकारचे लिखाण विरुपन केले गेले तर संबंधिताविरुध्द महाराष्ट्र डिफेन्समेंट ऑफ प्रापटी प्रिव्हेशन ऍक्ट मधील तरतुदीप्रमाणे संबंधीत विभागाने तात्काळ कारवाई करावी. अशी कार्यवाही करण्यात संबंधीत खात्याने कुचराई, टाळाटाळ वा दिरंगाई केल्यास विरुपणाच्या कृत्यात सहभागी असल्याचे गृहीत धरुन खात्याच्या प्रमुखासह व कारवाईसाठी जबाबदार अधिकाऱ्यासह दोषी व्यक्तीवर कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी आदेशित केले आहे.

एवढे असले तरी हिमायतनगर तालुक्यात राजकीय नेते, सामाजिक संघटनांना प्रसिद्धीचा मोह आवरेना झाला आहे. शहरातील परमेश्वर मंदिर, चौपाटी, उमर चौक, बाजार चौक, नांदेड - किनवट राज्य रस्त्यावरील सोनारी फाटा, सरसम, शहरात येणाऱ्या मुख्य कमानी, या ठिकाणी शेकडो होर्डिंगची गर्दी झालेली दिसत आहे. सध्याच्या झालेल्या बैनारच्या गर्दीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, त्याकडे लक्ष विचलित होवून अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. तसेच मागील चार्दीवास्पासून सर्वत्र वादळी वारे वाहत असून, यातून अपघात होवू शकतो. आचारसंहितेला यास २४ तास उलटले तरी आचारसंहितेचा भंग करणारी राजकीय नेत्यांच्या फोटोसह लावण्यात आलेली शुभेच्छा फलक, बैनर, होर्डिंग जैसे थेच आहेत. त्यामुळे हिमायतनगर शहरासह तालुक्यात एकप्रकारे आचार संहितेचा भंग होत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराकडे संबंधित विभागाने लक्ष देवून आचार संहितेचा भंग करू पाहणाऱ्या राजकीय पक्ष, संघटना, यांच्यावर करावी अशी मागणी होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी