दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या

लोहा येथे दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या, दोघांना पोलीस कोठडी

नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)भारतीय अर्थव्यवस्थेला खिळखीळी करण्यात बनावट नोटांचा महत्वपूर्ण भाग असतो असाच एक प्रकार नांदेड पोलीस दलाने उघडकिस आणला असून 2 लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटा दोघांकडून जप्त केल्या आहेत. या दोघांना लोहा न्यायालयाने 14 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.

दि. 8 मार्च रोजी परभणी जिल्ह्यातील 2 लोक बनावट नोटा घेवून त्या चलनात आणण्यासाठी लोहा येथे येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीसांनी तेथे रचलेल्या सापळ्यानुसार पोलीसांनी सचिन आवडू शिंदे वय 22 रा. कानेगाव डोबवाडी तांडा ता. सोनपठे जि.परभणी आणि रमेश ज्ञानोबा पवार वय 27 रा. तुंगी ता. औसा जि. लातूर या दोघांना पकडले त्यांच्याकडून एकाच क्रमांकाच्या, एकाच सीरीजच्या एक हजार रुपये दराच्या 200 नोटा जप्त करण्यात आल्या. या नोटाची किंमत 2 लाख रुपये आहे. या बाबत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीधर पवार यांनी दिलेल्या तक्रारीनंतर लोहा पोलीस ठाण्यात या दोघाविरुध्द 420, 489 (ब) (क), 34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

या दोघांना पकडण्यात स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.ए. डोअीफोडे, पोलीस उपनिरीक्षक विष्णु थोरात, पोलीस कर्मचारी भानूदास वडजे, दत्तराम जाधव, दिनानाथ शिंदे, आशाराम जाधव, पुंडलीक घुमनवार, रविंद्र कांबळे, राजकिरण सोनकांबळे, जगदीश कुलकर्णी आणि शे. मुजीबोद्दीन यांनी सापळा रचला होता.

या बनावट नोटा प्रकरणाची माहिती देतांनाच्या पत्रकार परिषदेत अपर पोलीस अधिक्षक शाम घुगे, गृहपोलीस उपअधिक्षक शामकांत तारे, पोलीस निरीक्षक श्रीधर पवार यांची उपस्थिती होती. काही दिवसापूर्वी रिझर्वबॅंक ऑफ इंडियाने नांदेड पोलीसांकडे 2 हप्त्यामध्ये 22 हजार रुपयांच्या बनावट नोटा पाठवल्या हेात्या त्या बाबत काय झाले या प्रश्नाला उत्तर देतांना ही कारवाई संबंधित पोलीस स्थानकाकडे पाठवण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक श्रीधर पवार यांनी सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी