शंकरपट

श्री परमेश्वर यात्रेतील शंकरपट स्पर्धेत धामनगांवची बैलजोडी अव्वल


हिमायतनगर(वार्ताहर)           महाशीवरात्री यात्रा उत्सवाच्या शेवटच्या टप्यात शेतक-यांसाठी शंकर पट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले,यात धामनगांव रेल्वे स्टेशन अमरावती यांच्या बैलजोडीने अव्वल क्रमांक जिंकुन 11 हजार 01 रुपयाचे प्रथम क्रमांकाचे पारीतोषीक जिंकले आहे.

दि.12 मार्च रोजी संपन्न झालेल्या या स्पर्धेत नऊ ठिकाणच्या बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता. सकाळी सुरु झालेली ही शंकरपट स्पर्धा सायंकाळी 6 वाजेपर्यंन्त चालाली. शंकरपटातील बैलांच्या धावन्याचे विंहंगम दृष्य बघण्यासाठी शंकर पट शौकीनांनी गर्दी केली होती. या स्पर्धेत कमी वेळेत धावणा-या बैलडोजीस क्रमांक देण्यात आले.यात किशोर पाटील वानखेडे याच्या बैलजोडीस प्रथम क्रमांक, खंडु पावडे वडगांव याच्या बैलजोडीस व्दीतीय क्रमांक, सुभाष पाटील हिमायतनगर यांच्या बैलजोडीस तिसरा क्रमांक, दत्तराव नरोडे याच्या बैलजोडीस चौथा क्रमांक, सुभाष पाटील याच्या बैलजोडीस पाचवा क्रमांक, बळीराम देवकते धानोरा याच्या बैलजोडीस सहावा क्रमांक, विनोद जाधव याच्या बैलजोडीस सातवा क्रमांक, भोजन्ना दुकानदार पवना यांच्या बैलजोडीस आठवा क्रमांक, कु.वैष्णवी ढाणकी यांच्या बैलजोडीस ननव्या क्रमांकाचे परितोषीक देण्यात आले आहे. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी समीतीचे अध्यक्ष नारायण बास्टेवाड, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, सेक्रेटरी सुभाष पाटील व विठ्ठलराव पालवे, दिगंबर वानखेडे, नारायण तुंबलवाड, यशवंतराव कुपटे, श्याम पाटील, गंगाधर बासेवाड, माधव विंगेवार, संतोष गाजेवार, डि.डि.काळे यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले.विजेत्या बैलजोडी मालकांच्या शेतक-यांंना मंदिर समीतीच्या सभागृहात बक्षीस वितरण करण्यात आले.    

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी