सांस्कृतीक कार्यक्रम

श्री परमेश्वर यात्रेतील सांस्कृतीक कार्यक्रमात प्रेक्षकांचा अतुलनीय प्रतीसाद


हिमायतनगर(अनिल मादसवार)       महाशीवरात्री यात्रा समाप्तीच्या दिशेने वाटचाल करीत असुन, दि.11 मंगळवारी सायंकाळच्या विविध कला गुणदर्शन कार्यक्रमात तालुक्यातील 12 शाळंानी सहभाग घेऊन कला - अविष्कार सादर केली. यात सिरंजणी येथील जिल्हा परीषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी गाण्याच्या माध्यमातुन माऊलीची पालखी विठल दर्शनासाठी दिंडीतुन काढुन उपस्थीतांना मंत्रमुग्ध केले. या शाळेतील विदयार्थ्यांच्या कलेला प्रथम क्रमांकाचे 3001 रुपयाचे बक्षीस मंदिर संस्थानच्या पदाधीका-यांच्या हस्ते देऊन गौरवीण्यात आले आहे.

तर पवना येथील जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या चांदण..चांदण या गीतावार कला- अविष्कार सादर करुन प्रेक्षकांची दाद मिळवीली, या शाळेस व्दितीय क्रमांकाचे 2001 रुपयाचे पारीतोषीक मंदिराच्या सदस्या सौ.लताबाई मुलंगे व श्रीमती मथुराबाई भोयर यांच्या हस्ते देण्यात आले. तर तालुक्यातील सोनारी फाटा येथील आोक्सफर्ड इंग्लीश स्कुलच्या चिमुतकल्यांनी सादर केलेल्या राधा ही धुंड रही थी..या गीतास तृतीय क्रमांकाचे 1001 रुपयाचे बक्षीस समीतीचे सदस्य मुलचंद पिंचा, आनंता देवकते, माधव पाळजकर, यांच्या हस्ते देऊन गौरवीण्यात आले आहे.या स्पर्धेत चिमुकल्या बालकंानी राधा ही बावरी, देवा तुज्या व्दारी आलों...मोरया मोरया... सत्यम शिवम सुंदरम्...आई भवानी तुझ्या कृपेनी तारसी भक्तांना, चला जेजुरीला जाऊ...अश्या विवीध गीतांवन धम्माल सादर करुन चिमुकल्या बालकांनी उपस्थीतांची मने जिंकली. या सांस्कृतीक कार्यक्रमात हुतात्मा जयवंतराव पाटील शाळा, गुरुकुल इंग्लीश स्कुल, स्व.मैनाबाई श्रीश्रीमाळ इंग्लीश स्कुल, जी.प.केंद्रीय शाळा खडकी बा, राजा भगीरथ हिमायतनगर, जि.प.केंद्रीय कन्या शाळा हिमायतनगर, यासह अन्य ठिकाणच्या शाळंानी सहभाग घेतला होता.यावेळी शाळेच मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षीका, शालेय मुला-मुलींसह त्यांचे पालक, परमेश्वर मंदिर यात्रा समीतीचे सदस्य व नागरीक हजारोंच्या संख्येने उपस्थीत होते.या स्पर्धेसाठी विशेष करुन शहर व ग्रामीण परिसरातील महीला पालकांनी उपस्थीती लावली होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी