रेल्वेच्या वेळापत्रकानुसार शाळेवर हजेरी..

जी.प.शाळेच्या मुख्याध्यापकाची मनमानी...
रेल्वेच्या वेळापत्रकानुसार शाळेवर हजेरी..



हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरातील जी.प.मराठी व उर्दू शाळेच्या नूतन मुख्याध्यापकाने मनमानी कारभार सुरु केला असून, आपल्या सुविधेप्रमाणे शाळेचे वेळापत्रक ठरवून रेल्वेने येणे - जाने सुरु केले आहे. त्यामुळे उर्दू - मराठी विभागातील शिक्षकही तोच कित्ता गिरवीत आपल्या सोयीनुसार शाळेवर दाखल होत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षकाची वाट पाहत ताटकळावे लागत असल्याने शैक्षणिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. संबंधितानी मनमानी कारभारात सुधारणा न केल्यास कोणत्याही क्षणी शाळेला कुलूप लावण्यात येईल असा इशारा शिक्षण प्रेमी पालकांनी दिला आहे.

शहरातील जुन्या गटशिक्षण अधिकारी कार्यालयासमोर असलेल्या जी.प.शाळेत मराठी व उर्दू विभागाचे पाचवी ते दहावी पर्यंतचे वर्ग भरविले जातात. सदरची शाळा हि दोन सत्रात चालविली जात असून, दोन्ही माध्यमाचे मिळून जवळपास ९०० हून अधिक विद्यार्थी - विद्यार्थिनी या ठिकाणी ज्ञानार्जन करतात. शाळेची पहिले सत्र हे ७.२० लाभाविण्याचे असताना येथे कार्यरत मुख्याध्यापक यांनी मनमानी पद्धतीने शाळेची वेळ आपल्या सोयीनुसार ७.४० ची केली आहे. नांदेडला राहून ये - जा करण्यासाठी हि वेळ ठरविली असून, तरीसुद्धा नंदीग्राम एक्सप्रेस हि उशिरा येत असल्याचे चक्क जी.प.शाळा सकाळी ८ वाजता भरविली जात आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शिक्षणिक नुकसान होत आहे. हि बाब शाळा व्यवस्थापन समितीला व पालकांना समजताच याचा जाब विचारला. 

त्यानंतर काही दिवसा शासकीय वेळेनुसार शाळा भरविण्यात आली. परंतु पुन्हा पहिले पाध्ये पंचावन्न या उक्तीप्रमाणे खुद्द मुख्याध्यापकाने मनमानी कारभार सुरु केले. हे पाहून बाहेरगावी राहणाऱ्या अन्य शिक्षकांनीसुद्धा तोच प्रकार अवलंबविला आहे.हा प्रकार येथील गटशिक्षण अधिकारी यांच्या डोळ्यादेखत घडत असताना ,त्यांनी चुप्पी का साधली असा सवाल पालक वर्ग विधारित आहेत. 

पहिले सत्र उशिराने भारत असल्याने दुपारी भरविल्या जाणार्या १२.२० चे सत्रही एक तास उशिराने भरविले जात असून, त्यामुळे दुसर्या स्तरातील विद्यार्थ्यांना केवळ ३ ते ३.५ तसाच शिक्षण दिले जात आहे. त्यातही सायंकाळची नंदीग्राम एक्सप्रेस पकडण्यासाठी अर्धवट तासिका सोडून पलायन केले जात असल्याने आठवी ते दहावीच्या विध्यार्थांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या शाळेची गुणवत्ता ढासळली असून, परिणामी विद्यार्थ्यांची संख्या कमी -कमी होत चालली आहे. या शाळेत चालविल्या जाणर्या या आलबेल कारभाराकडे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री काळे यांनी लक्ष देवून हिमायतनगर च्या जी.प.शाळेतील विद्यार्थ्यांचे होत असलेले नुकसान टाळावे अशी मागणी शिक्षण प्रेमी पालकांनी केली आहे.  


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी