ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता

दिप प्रज्वलन व शोभा यात्रा व काल्याच्या किर्तनाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता....।

हिमायतनगर(धम्मपाल मुनेश्वर)मागील आठ दिवसापासुन सुरु असलेल्या अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची सांगता दि.04 रोजी ग्राम िंदडीं व हभप.माधव महाराज शिवणीकर यांच्या मधुर वाणीतील काल्याच्या किर्तनाने करण्यात आली. काल्याच्या किर्तनाला ग्रामीण व शहरी भागातुन हजारोंच्या वर श्री परमेश्वर भक्तांचा जनसागर लोटला होता.

ग्रंथराज पारायण शेवटच्या दिवशी रात्रीला ओम आकारातील दिव्याची ज्योत लाऊन मंदिर कमेटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्या हसेत दिपप्रज्वल करण्यात आले, यावेळी संपुर्ण मंदिर परिसर दिव्यांच्या उजेडाने उजळुन निघाला होता. तसेच हरिणाम सप्ताहच्या समाप्तीनीमीत्त सकाळी प्रथम ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची पालखी दिंडी व्यासपीठाचार्य माऊली ज्ञानेश्वर महाराज बोरगडीकर यांच्या नेतृत्वाखील शहरातील मुख्य रस्त्यावरुन काढण्यात आली. या शोभा यात्रेत महीलां, मुलींनी डोक्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ व तुलसी वृंदावण घेऊन सामील झाल्या होत्या. तसेच टाळ मृदंगाच्या गजरात श्री परमेश्वर भजनी मंडळाच्या वारकरी महीला व पुरुषांनी ताल धरुन शहरवासीयांना आकर्षीत केले. सदर शोभा यात्रा परत श्री पमेश्वर मंदिरात येऊन सत्कार समारंभ व महाप्रसादाने समारोप करण्यात आला.

सायंकाळी 4 वाजता काल्याच्या किर्तनानंतर दहीहंडी फोडलेल्या राधाकृष्णीची मीरवणुक शहरातील मुख्य रस्त्यावरुन बैंडबाज्याच्या गजरात काढण्यात आली होती. यावेळी परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष महावीरसेठ श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी राजेश्वर चिंतावार, लक्ष्मण शक्करगे, प्रकाश शींदे, विठलराव वानखेडे, आनंता देवकते, प्रकाश कोमावार, राजाराम बलपेलवाड, माधवराव पाळजकर, संभाजी जाधव, मुलचंद पिंचा, शाम पवनेकर, लताबाई पाध्ये, लताबाई मुलंगे, मथुराबाई भोयर, यात्रा कमेटीचे उपाध्यक्ष सुभाष शींदे, सचीव संजय माने, गजानन चायल, पत्रकार प्रकाश जैन, अनिल मादसवार, अनिल भोरे, प्रकाश साभळकर, रामराव सुर्यवंशी, राजु गाजेवार, देवराव वाडेकर, यांच्यासह बजरंग दलाचे युवक स्वयंसेवक व गावकरी नागरीक महीला - पुरुष बहु संख्येने उपस्थीत होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी