अभियंता अडकला अप संपदे च्या जाळ्यात

पाटबंधारे विभागातील उपविभागीय अभियंता अडकला अप संपदे च्या जाळ्यात

नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)नांदेड पाटबंधारे विभागातील उपविभागीय अभियंता यशवंत बळीराम निखाते, त्यांची पत्नी व तीन मुले यांच्याकडे कायदेशीर मिळकतीपेक्षा उत्पन्न जास्त आढळल्याने त्यांच्याविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिलसिंह राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यशवंत बळीराम निखाते हे नांदेड पाटबंधारे विभागात कार्यरत असून, ते सध्या उपविभाग किनवट येथे उपविभागीय अभियंता म्हणून सेवा बजावतात. त्यांच्या कुटुंबियांनी अवैध मालमत्ता संपादीत केल्याबाबतचा तक्रार अर्ज माननीय लोक आयुक्त मुंबई यांच्याकडे प्राप्त झाला होता. त्यानुसार सदर प्रकरणात उघड चौकशी करण्यात आल्यानंतर लोकसेवक यशवंत बळीराम निखाते, त्यांच्या पत्नी चंद्रकला यशवंत निखाते, मुलगा दिनेश यशवंत निखाते, अनिकेत यशवंत निखाते आणि अविनाश यशवंत निखाते सर्व रा.रामानंदनगर नांदेड यांच्याकडे कायदेशीर उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता (आपसंपदा) मिळून आली.

2010 पर्यंत त्यांच्याकडे 1 कोटी 4 लाख 31 हजार 327 रुपये आढळून आल्याने व त्यांनी कुटुंबियांना सहकार्य केले म्हणून त्यांच्याविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 13 (1) (ई) सह 13 (2) भ्र.प्र.अ. 1988 व कलम 109 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस उपअधीक्षक अनिलसिंह राजपूत, एम.जी.पठाण, भिमराव शिंगाडे यांच्यासह परभणीचे व्ही.एन.डोंगरे, हिंगोलीचे जी.व्ही.दिवे, लातूरचे व्ही.पी.काळे यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी संपादीत केलेल्या स्थावर मालमत्तेवर वेगवेगळ्या पथकामार्फत छापे टाकून झडतीची कारवाई सुरु असल्याचे तपासीक अंमलदार पोलीस उपअधीक्षक अनिलसिंह राजपूत यांनी सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी