मुलीची छेड काढल्यावरून तणाव

मुलीची छेड काढल्यावरून तणाव..
दुचाकी जाळून संतप्त युवकांनी बाजारपेठ केली बंद


हदगाव(वार्ताहर)शिकवणी वर्गाहून गावाकडे परत जात असलेल्या एका शाळकरी मुलीची दोन मुस्लिम युवकांनी दुचाकीवरून येवून भररस्त्यात छेड काढल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला होता. यावरून छेड काढणाऱ्या त्या दोन टपोरींना येथील युवकांनी मुख्य बाजार पेठेत मारहाण करून दुचाकी पेटवून दिली. याघटनेमुळे हदगाव मध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मुलीची छेड काढल्यावरून तणाव निर्माण झाला होता. या दहशतीने सर्व बाजारपेठ बंद करण्यात आली होती.तणाव निवाळण्यासाठी हदगाव येथे उपविभागीय पोाीस अधिकारी दत्तात्र्य कांबळे यांनी येवून भेट देवून शांततेचे आवाहन केले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, हदगाव शहरात विविध महाविद्यालये, शिकवणी वर्ग असल्याने या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आस पासच्या खेडातील मुळे - मुली दररोज ये - जा करीत असतात. काही शिकवणी वर्ग हे सायंकाळी होत असल्याने या शिकवणी वर्गासाठी खेडातील मुालि मोठ्या प्रमाणात शहरात येतात. परंतु शिकवणी वर्गासाठी जातांना व येतांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. शिकवणी वर्गात जात असतांना या अगोदर सुद्धा अनेक मुलींची टवाळखोरी करणाऱ्या टपोरि मुलांनी छेड काढल्याच्या घटना घडल्या होत्या. परंतु त्यानंतरही येथील पोलिसांनी मुलींच्या सुरक्षेसाठी चिडीमार पथके काही दिवस ठेवून पुन्हा बंद केली.

त्याचाच फायदा घेत पुन्हा शहरात टवाळखोरी करणे व धूम स्टाईलने गाड्या पळविणारे सक्रिय झाले आहे. अशीच एक घटना आज डी.२५ मंगळवारी हदगाव शहरातील मुख्य बाजार पेठेत घडली. सायंकाळो शिकवणी वर्ग करुन गावाकडे जात असतांना मुख्य बाजारपेठेत असलेल्या हनुमान मंदिराच्या परिसरामये दुचाकीवर दोन मुस्लीम युवकांनी येऊन शाळकरी मुलीच्या समोर दुचाकी आडवी लावुन तीची छेड काढाली असता आजूबाजूला असलेल्या युवकांनी सदरील प्रकार आपल्या डोळ्याने पाहिल्याने त्यांचा राग अनावर झाला. आणि संतप्त युवकांनी दुचाकीवर आलेल्या सदरील मुस्लिम युवकास पकडुन पोलीस स्थानकात नेले. यावेळी त्यांच्यापैकी एक युवक पळुन जाण्याश यशस्वी झाला. त्यानंतर सदरील घटने बद्दल संतप्त युवकांनी दुचाकी जाळून हदगाव येथील बाजारपेठ बंद केली. या घटनेमुळे हदगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हि घटना शहरात वार्‍यासारखी पसरल्याने चौका - चौकात नागरीक या घटनेची चर्चा करू लागले होते.

शहरातील तणावपूर्ण वातावरण निवळण्यासाठी उपविभागीय पोलिस आधीकारी सिद्धार्थ कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. वृत्त लीहीपर्यंत हदगाव पोलिस स्थानकात कोणत्याही प्रकाराचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी