टाकाऊ कचर्यापासून होळी

टाकाऊ कचर्यापासून होळी करून चिमुकल्यांनी दिला पर्यावरण वाचवाचा संदेश

हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील रुख्मानी नगर परिसरातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ कचऱ्यापासून होळी करून, पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला आहे. चिमुकल्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

रुख्मिनीनगर कॉलनीतील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालायचे प्राध्यापक कागणे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील चिमुकल्या बालकांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण पूरक होळी साजरा करून नैसर्गिक रंग व रासायनिक रंग यातील फरक जाणून घेण्याचा संकल्प केला. यावेळी चिमुकल्यांनी परिसरातील केर - कचरा गोळा करून अवघ्या दोन - तीन तासाच्या मेहनतीतून प्लॉस्टीक, कचरा, कापड, लाकडी काड्या एकत्र करून मोठी होळी तयार केली. सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान होळीची - पूजा अर्चना करण्यात येवून होळी साजरी करण्यात आली. याप्रसंगी होळी रे होळी पुरणाची पोळी... होळी करा लहान, पोळी करा दान’, ‘वृक्ष तोड करु नका, पर्यावरणाचे रक्षण करा’ नैसर्गिक रंगांची रंगपंचमी साजरी करून होळीचा आनंद लुटा...असा संदेश देण्यात आला. यावेळी प्रणव कागणे, अथर्व दमकोंडवार, उत्कर्ष मादसवार, स्नेहीत पेन्शनवार, प्रतिक नरवाडे, दिनेश इंगळे, ओंकार मोतेवार, सृजल बोकारे, ओंकार कोडगीरवार, वरद पेन्शनवार, वेदांत मोतेवार आदींसह कागणे सर, आंडगे सर, बोकारे सर, पत्रकार अनिल मादसवार यांच्यासह परिसरातील नागरिक बालगोपाळांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी