बारा वर्ष सक्तमजूरी व १० हजार दंड

50 वर्षीय नराधम बलात्काऱ्यास बारा वर्ष सक्तमजूरी व १० हजार दंड

नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)पोटदुखी बरी करण्याच्या बहाण्याने (15) वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तीला गरोदर करणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला येथील पहिल्या अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश सौ. कविता अग्रवाल यांनी 12 वर्ष सक्त मजुरी व दहा हजार रूपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

अर्धापूर शहरात राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीला बरेच वर्षापासून पोटदुखीचा आजार होता. तिची आई वेडसर असल्याने तिचे कुटूंबाकडे लक्ष नव्हते. तिचे वडील आणि भाऊ लोकांच्या शेतावर मजुरीकरून आपल्या कुटूंबांचा उदरनिरवाह चालवत असत. अशा परिस्थीत जगणाऱ्या या मुलीच्या पोटदुखी आजाराकडे सतत दुर्लक्ष होत होते. त्यावेळी काही ओळखीच्या लोकांनी इंदिरानगर अर्धापूर येथे राहणाऱ्या 50 वर्षीय रानबा तुकाराम शेळके यांच्या बाबत त्यांना सांगीतले. तो मांत्रीक असुन त्यांच्याकडुन इलाज करून घेतला तर पोट दुखी बरी होते असे सांगीतले. यावरून रानबा शेळकेकडे या आल्पवयीन मुलीचा इलाज सुरू झाला. तो आगोदर स्वतःच्या घरी या मुलीला मंतरलेले पाणी देवुन इलाज करत असे पुढे जस जसी ओळख वाढली रानबा शेळके हा मुलीच्या घरी येवुन तिला मंतरलेले पाणी देवु लागला. दरम्यान एकदा तिच्या घरात कोणीच नाही असे पाहुण रानबाने एकदा तिच्या पोटावरून हात फिरवना आणि आशलील चाळे केले. यावर बालीकेने अक्षेप घेतला असता तुला असलेली पोटदुखी दोन वैद्यानी केली असुन तो करणीचा प्रकार आहे. असे सांगुन तिला भुलवले. आणि तिच्यासोबत बलात्कार केला. एकदा केलेले कृत्य पुन्हा पुन्हा करण्यात रानबाला काही जास्त आडचण आली नाही. तो या बालीकेला तुझी पोटदुखी बरी व्हायची असेल तर हे करावेच लागेल असे सांगत असे आणि तीच्या बलात्कार करत असे. नेहमीच्या या कृष्णकृत्याने अखेर रंग दाखवला आणि बालीका गरोदर झाली. तिचे वाढलेले पोट पाहता तिच्या भावाने विचारल्यानंतर तिने सर्व हाकीकत आपल्या भावाला सांगीतली आणि दि. 12 जुन 2012 रोजी रानबा शेळके विरूध्द पोलीस ठाणे अर्धापूर येथे तक्रार दिली. अर्धापूर पोलीसांनी रानबा शेळके विरूध्द भादवी कलम 376,452,506 नुसार गुन्हा दाखल केला. पोलीस निरिक्षक उत्तम मुळक यांनी सखोल तपासानंतर रानबा शेळकेविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

न्यायालयात हे प्रकरण महिला न्यायाधिश सौ. कविता आग्रवाल यांच्या समक्ष सुनावनीला आले. या प्रकरणी न्यायालयात 7 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. वैद्यकिय अधिकारी स्वतः पिडीत बालीका यांच्या साक्षीला आधार माणुन न्यायाधिश कविता आग्रवाल यांनी 50 वर्षी बलात्काऱ्याला 12 वर्षीय सक्त मजुरी आणि दहा हजार रूपये रोख दंड अशी शिक्षा ठोटावली.दंडाची 10 हजार रूपये रक्कम पिडीत अल्पवयीन मुलीला देण्याचे आदेशही न्यायाधिश सौ कविता आग्रवाल यांनी दिले आहेत. या खटल्यात सरकार पक्षाची बाजु ऍड. बालाजी शिंदे यांनी मांडली तर आरोपी रानबा शेळकेच्या वतीने ऍड. उत्तम कसबे यांनी काम पाहिले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी