सर्किट हाउसला आग

परमेश्वर मंदिराच्या सर्किट हाउसला आग...२ लाखाचे नुकसान

हिमायतनगर(अनिल मादसवार)महाशिवरात्रीच्या यात्रेची रंगत वाढत असताना अचानक जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरातील सर्किट हाउस व स्टोअर रूमला आग लागून दोन लाखाचे नुकसान झाल्याची घटना दि.०२ च्या रात्री च्या ९.३० वाजता ऐन हरीकीर्तनाच्या वेळी घडली. या घटनेमुळे भाविक - भक्तांमध्ये एकच धावपळ उडाली होती. युवकांच्या सतर्कतेमुळे तासभरात आग आटोक्यात आणल्या गेली अन्यथा मोठी वित्त हानी झाली असती.

शेकडो वर्षापासून येथील श्री परमेश्वर मंदिराची यात्रा महाशिवरात्रीच्या पर्वावर भरविली जाते. सदर यात्रा हि १५ दिवस खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न होते. यात्रेला सुरुवात होवून पाच दिवसाचा कालावधी लोटला असून, पहिल्याच आठवडी बाजारातील मुख्य परमेश्वर चौकातील डी.पी.ला आग लागण्याची घटना घडली होती. त्यानंतर यात्रा सुरळीत रित्या सुरु झाली असून, मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु असून, पाचव्या दिवशी सायंकाळी ९ वाजता हभप मधुकर महाराज सायाळ जी.परभणी यांचे हरीक्रीतानाला सुरुवात झाली होती. सर्व भाविक भक्त हरीकीर्तानात तल्लीन झाले असताना अचानक भव्य स्फोट झाला. आणि भाविक - भक्तांची एकच धावपळ सुरु झाली.

दि.०२ च्या रात्री स्फोट झालेल्या दिशेने पाहणी केली असता मंदिरातील सर्किट हाउस व स्टोअर रुमच्या खिडकीतून दूरचे लोट बाहेर येताना दिसले. तातडीने स्वयंसेवक युकानी खोलीचे दार तोडले असता आगीचे गोलेच्या गोळे बाहेर पडत होते. तातडीने महावितरण कंपनीच्या कर्मचार्यास पाचारण करण्यात येवून शहरातील विद्दुत पुरवठा बंद करण्यात आला. मंदिराच्या सोई सुविधीसाठी उपस्थित झालेल्या सर्व स्वयंसेवकांनी भांडे, बाकीट यासह मिळेल त्या साहित्याने पाणी आणून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. तसेच स्टोअर रूममधील साहित्य काढण्याच्या प्रयत्न केला. परंतु या आगीत विद्दुत पुरवठ्याची इनव्हर्तर मशीन व दोन बैटरी जाळून खाक झाली, टेंट -४, सतरंजी - १०, मैट - ९, पलंग- २, टेबल - ३, गादी -१०, चादर - १०, फैन -१, स्टोअर रूमचे दार आदींसह विदूत पुरवठा व लग्न समारंभासाठी भाड्याने देण्यात येणारे साहित्य आगीच्या भक्षस्थानी सापडले. या सर्वांची जळून राख होवून तब्बल २ लाखाहून अधिकचे नुकसान झाल्याची माहिती मंदिर समितीचे सेक्रेटरी राजेश्वर चिंतावार, उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी नांदेड न्युज लाइव्ह्शि बोलताना दिली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील चव्हाण यांनी मंदिरास भेट देवून आग लागलेल्या घटना स्थळाची पाहणी केली. वृत्त लिहीपर्यंत मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष असलेले तहसीलदार अथवा कार्यालयाच्या एकाची कर्मचार्याने भेट दिली नव्हती.

ऐन कीर्तनाच्या वेळी लागलेल्या आगीमुळे तास भर भक्तिमय कार्यक्रमात व्यत्यय निर्माण झाला होता. त्यानंतर मंदिर समितीचा पुढकार व युवकांच्या सहकार्यामुळे आग आटोक्यात आल्यानंतर जनरेटरची व्यवस्था करून हरीकीर्तानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मंदिर समितीचे सेक्रेटरी राजेश्वर चिंतावार, उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, संचालक लक्ष्मण शक्करगे, भास्कर दुसे, प्रकाश शिंदे, किशनरामलू मादसवार, संभाजी जाधव, मुलचंद पिंचा, देविदास मुधोळकर, प्रकाश कोमावार, विठ्ठलराव वानखेडे, अनंता देवकते, श्याम पावणेकर, वामनराव बनसोडे, राजाराम झरेवाड, माधव पाळजकर, सौ.लताबाई पाध्ये, सौ.लताबाई मुलंगे, श्रीमती मथुराबाई भोयर, लिपिक बाबुराव भोयर, प्रभाकर मुधोळकर, विजय बंडेवार, डॉक्टर मामीडवार, बाबू अप्पा बंडेवार, नांदेड न्युज लाइव्ह्चे संपादक, पत्रकार प्रकाश जैन, पांडुरंग गाडगे, अनिल भोरे, आदींसह शेकडो भाविक - भक्त, गावकरी मंडळी, बजरंग दल मित्रमंडळ व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी