अवैध्य देशी विक्रेत्यास ताब्यात

अवैध्य देशी विक्रेत्यास ताब्यात घेतले...मात्र कार्यवाही गुलदस्त्यात

हिमायतनगर(अनिल मादसवार)नांदेड - किनवट राज्य रस्त्यावर असलेल्या इंदिरानगर सरसम येथील एका अवैध्य रित्या देशी दारूची विक्री केल्या जाणार्या अड्यावर दि.१८ रोजी छापा मारून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची कार्यवाही मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याच्या चर्चेने तालुका भरात उलट - सुलट चर्चेला उधाण आले आहे. हा छापा स्थागुशाच्या पथकाने टाकल्याची चर्चा तालुका भरात सुरु होती.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मागील अनेक वर्षापासून सरसम प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ असलेल्या जी.प.शाळेच्या पाठीमागे राजरोसपणे देशी दारूची विक्री केली जात आहे. हि बाब अनेकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली मात्र पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे सदर विक्रेता निर्ढावला असल्याने, दिवस देशी पिवून रस्त्यावर फिरणार्यांची तळीरामांची संख्या वाढली आहे. यामुळे महिला - मुलीना व शाळेतील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यथेछ मद्यप्राशन करून उघड्यावर लघुशंका करणार्यामुळे शाळेचा परिसर दुर्गंधीयुक्त होत आहे.

स्थानिक गुहे शाखेच्या भरारी पथकाने छापा टाकून देशी दारूच्या मुद्देमालासह शे.फकीर शे.आम्बीर नामक आरोपीस ताब्यात घेतले असे नागरिकांचे म्हणणे आहे.सदर आरोपीस घेवून भरारी पथकाची गाडी भर्र.. भर्र...करत हिमायतनगरच्या दिशेने निघाली खरी परंतु हिमायतनगर पोलिस स्थानकात पोहोचून आरोपीवर अवैध्य देशी दारू विक्री करत असल्या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे स्थागुशाच्या भरारी पथकाची कार्यवाही केवळ " फार्स " होती कि काय..? अश्या उलट -सुलट चर्चा सरसम परिसरात होत आहेत.

या विषयी स्थागुशाचे पोलिस निरीक्षक श्रीधर पवार यांच्याशी भ्रमण ध्वनिवरुन संपर्क साधला असता स्थानिक गुन्हे शाखेचे कोणतेही पथक हिमायतनगर कडे आले नसल्याचे त्यांनी सांगितले. तर मुद्देमालासह आरोपींना पकडणारे पथक तोतया पोलिस होते कि काय..? अशी शंका नागरीकातून उपस्थित होत आहे.

याबाबत पोलिस निरीक्षक सुरेंद्र सोनवणे यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले कि, हा छापा स्थागुशाच्या अधिकार्यांचा नसून, उत्पादन शुल्क विभागाच्या अधीकार्यांनी टाकला आहे. सदर आरोपीस परस्पर भोकर येथील कर्यालयाकडे नेण्यात येवून गुन्हा दाखल केला जातो असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी