मतदार संघाच्या विकासासाठी ४ कोटीचा निधी

हदगाव - हिमायतनगर मतदार संघाच्या विकासासाठी ४ कोटीचा निधी ...जवळगावकर  
हिमायतनगर शहरात ०१ कोटी १८ लक्ष ५० हजाराच्या निधीतून कामे होणार 



हिमायतनगर(वार्ताहर)हदगाव - हिमायतनगर तालुक्यातील विविध विकास कामासाठी ४ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून, एकट्या हिमायतनगर शहराच्या विकासासाठी ०१ कोटी १८ लक्ष ५० हजाराचा निधी दिल्याची माहिती आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

आगामी लोकसभेच्या निवडणुका तोंडावर येवून ठेपले असताना जवळगावकर यांच्याकडून विकास कामांचे चौकार आणि सत्कार ठोकण्यात येत आहे. शहरासह तालुक्यातील विकासाचा शिल्लक असलेला अनुशेष भरून काढण्यासाठी कोणतीही कसर ठेवली जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. हिमायतनगर शहरातील विकास कामासाठी ०१ कोटी १८ लक्ष ५० हजार रुपयाचा निधी, जवळगाव येथे सभागृह व सिमेंट रस्ता बांधकामासाठी १३ लक्ष ५० हजार, पंचायत समिती हदगाव अंतर्गत तामसा, मनुला, मरडगाव, नेवरी, कोहळी, हाडसनी, मनाठा, चक्री, भाटेगाव, करमोडी अंतर्गत कामांसाठी २ कोटी ८१ लक्ष ५० हजार एवढा निधी मंजूर झाला आहे. यातून अंतर्गत विकास कामे दर्जेदार पद्धतीने करण्यात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पांडुरंग गाडगे, सचिव अनिल मादसवार, कार्याध्यक्ष प्रेमकुमार धर्माधिकारी, उपाध्यक्ष दत्ता शीराने, परमेश्वर शिंदे, संघटक कानबा पोपलवार, कोषाध्यक्ष अनिल भोरे, दिलीप शिंदे, धम्म मुनेश्वर, संजय कवडे, जी.प.सदस्य सुभाष राठोड, ज्ञानेश्वर शिंदे, छायाचित्रकार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी