आगरप्रमुखाकडून केराची टोपली

उमरखेड - ढाणकी - हिमायतनगर बस सुरु करा...
ग्रा.प.मागणीच्या ठरवाला उमरखेड आगरप्रमुखाकडून केराची टोपली ...




हिमायतनगर(अनिल मादसवार)उमरखेड - बोरी - हिमायतनगर आणि उमरखेड - ढाणकी - हिमायतनगर असा टापोटाप रस्ता सुरु असताना देखील उमरखेड आगाराने अद्यापपर्यंत बस सेवा सुरु केली नाही. परिणामी प्रवाशांना अवैध्य वाहतुकीने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. मागील तीन महिन्यापासून प्रवाश्यांसह संबंधित ग्राम पंचायतीने उमरखेड आगर प्रमुखांना बस सुरु करण्याच्या मागणीचे ठराव दिले, परंतु बस सुरु न करता आगर प्रमुखांनी केराची टोपली दाखविल्याने सामान्य नागरीकातून संताप व्यक्त होत आहे. 

मागील पाच वर्षापूर्वी विदर्भ - आंध्रप्रदेश मार्ग जोडण्यासाठी कोट्यावधी रुपयातून पंतप्रधान ग्रामसडक योजेच्या माध्यमातून हिमायतनगर - डोल्हारी या रस्त्याचे काम पूर्ण झाले. तर बोरी मार्गावरील भव्य अश्या पुलाचे कामही संपुष्टात आले आहे. परंतु या जोड रस्त्यावर अद्याप कतम्स्वरुपि बससेवा सुरु झाली नाही. हि बाब अनेक वेळा परिसरातील नेत्यांच्या निदर्शनास ग्रामस्त व प्रवाश्यांनी आणून दिली. मात्र कमी खर्चात मिळणाऱ्या नागरिकांच्या या प्रमुख समस्येकडे संबंधितांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. 

हिमायतनगर शहराची बाजारपेठ मोठी आहे, त्यातच या ठिकाणच्या श्री परमेश्वर मंदिराला तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळाल्याने दररोज या ठिकाणी येणाऱ्या - जाणार्यांची संख्या मोठी असते. हि बाब अक्षात घेता तसेच दळण - वळणाच्या मध्य मार्ग म्हणून मागील अनेक वर्षापासून उमरखेड आगाराच्या वतीने विदर्भ - मराठवाड्यातील जनतेच्या सुविधेसाठी पावसाळा संपल्यानंतर बससेवा सुरु करून, गैरसोय दूर केली जात होती. परंतु २०१४ वर्ष सुरु झाले तर पावसाळा संपून हिवाळ्याचे दिवस संपण्याच्या मार्गावर असताना देखील उमरखेड आगाराने हिमायतनगर - उमरखेड बस सेवा सुरु केली नाही. परिणामी विदर्भातील नागरिकांना रेल्वे मार्गाने प्रवास करण्यासाठी नाईलाजास्तव अवैध्य प्रवाशी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे.  

हि बस सेवा सुरु झाल्यास विदर्भातील भाविक भक्त, नागरिकांना तिरुपती, शिर्डी, मुंबई, औरंगाबाद, हैद्राबाद, नांदेडसह अन्य ठिकाणच्या तीर्थ स्थळी जाण्यासाठी कमी खर्चातील मार्ग होणार आहे. तसेच शाळेत ये - जा करणाऱ्या विद्यर्थिनिना हि बस सोयीची होवून सुरक्षित प्रवास करता येणार आहे. हि बाब लक्षात घेत उमरखेड - हिमायतनगर बस सेवा तातडीने सुरु करून कर्मचारी, नागरिक, भाविक, व्यापारी व विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी अन्यथा ग्रामस्थ व नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी