भूमिपूजन

गणेशवाडी येथील हनुमान मंदिर बांधकामचे भूमिपूजन 

हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील आदिवासी भागातील गणेशवाडी येथील हनुमान मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन श्री.श्री.१००८ महंत जीवनदास महाराज चुडावा यांच्या शुभ हस्ते व पुरोहित कंटा गुरु वाळके यांच्या मंत्रोच्चार वाणीत करण्यात आले.

गणेशवाडी हे गाव पुनर्वसित असून, या गावाच्या स्थापनेला जवळपास २० वर्षाचा कालावधी लोटला आहे. तेंव्हापासून गावात स्थापन केलेले हनुमान मनिद्र हे विकस्पसुन दूर असून, केवळ तीन शेडमध्ये येथील ग्रामस्थ पूजन व दर्शन करीत आहेत. हि बाब लक्षात घेत येथील ग्रामस्थांनी कोणत्याची राजकीय नेत्याकडे हात न फैलावत वर्गणीतून निधी जमा करून मंदिराचे बांधकाम करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार जमा झालेल्या देणगीतून दि.०५ बुधवारच्या शुभमुहूर्तावर  भूमिपूजना पूर्वी सकाळी ८ वाजता हनुमंतरायाच्या मूर्तीचा अभिषेक महापूजा करण्यात आली. त्यानंतर हनुमान मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन श्री.श्री.१००८ महंत जीवनदास महाराज चुडावा यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजा अर्चनाने करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील सत्यव्रत्त ढोले, प्रकाश जाधव, मोहिते काका, यादवराव गुरुजी, ग्रामसेवक शिवलाड, वामनराव जाधव, नामदेव पार्डीकर, सरपंच साळूबाई धनवे, शंकरराव जाधव, जयराम ढोले, कामनाराव जाधव, परमेश्वर गारोळे, मारोती धनवे, गाजू कुंतलवाड, दिलीप आडे, बाळू सूर्यवंशी, महेश ताडकुले, माधव काळे, परमेश्वर जाधव, माधव जाधव, लक्ष्मण ढोले, गणपत जाधव, प्रकाश पोटे, बबन जाधव, यांच्यासह गावातील लहान, मोठे महिला - पुरुष नागरिक बहुसनखेने उपस्थित होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी