जनजागृती मोहीम कागदावरच../

हिमायतनगर तालुक्यात पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाची जनजागृती मोहीम कागदावरच../

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यात एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन व्हावे या उदात्त हेतूने शासनाने कोट्यावधी रुंपये खर्चाची तरतूद योजनेच्या माध्यमातून केली आहे. पाणलोट व्यव्सथपन कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आजपर्यंत या कार्यक्रमाविषयी जनजागृती करण्यासाठी लाखोचा खर्च करण्यात आला आहे. परंतु या जनजागृती कार्यक्रमाला जुंपलेल्या यंत्रणेने जनजागृतीच्या नावाखाली लाखोचा भ्रष्टाचार करून सदर मोहीम केवळ कागदोपत्रीच राबवून शासनाची मोठी दिशाभूल केली आहे.

हिमायतनगर ताकुक्यात एकूण २७ गावामध्ये पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत विविध प्रकारची विकास कामे करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. तालुका कृषी विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी गावातील नागरिकांना अंधारात ठेवून विकास कामे केवळ कागदावर जास्त..मात्र प्रत्यक्षात कमी करण्याची मोहीम चालवीत आहेत. अनेक गावातील नागरिकांना या पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाविषयी कुठलीही माहिती नसल्याचे चित्र दिसून येत आहे. सर्व ग्रामीण भागातील नागरिक शेतावर कामासाठी निघून गेल्यावर ऐन दुपारच्या वेळी येवून, काही बोटावर मोजण्या इतक्याच लोकांना हाताशी धरून कर्तव्यावर असलेले कर्मचारी व अधिकारी गावात जनजागृती केली असे खोटे दस्तऐवज तयार करून बनवत स्वाक्षर्या केल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत होत असलेली विकासाची कामे कोणती, या विषयी अगोदर सविस्तर पाने जनजागरण करणे महत्वाचे असून, होणार्या विकास कामाविषयी त्या त्या गावातील नागरिकांना विस्तृत माहिती झाल्यास सदरची कामे अतिशय दर्जेदार होतील.

शासनाने दिलेल्या अंदाजपत्रकानुसार कामे केली जावीत अशी नियमावली आहे. परंतु अंदाजपत्रकाला खुंटीला टांगून सदरची कामे करता यावीत या उद्देशाने हि अगोदरची जनजागृती मोहीम केवळ कागदोपत्रीच राबविण्यात येत असल्याचा आरोप सुजान नागरीकातून केला जात आहे. बहुतांश गावामध्ये या प्रभावी अभियानाअंतर्गत अनेक प्रकारची साहित्य उपलब्ध झाली आहेत. परंतु उपलब्ध साहित्याचा विनियोग बोटावर मोजण्या इतक्याच ठिकाणी होत असून, बहुतांश ठिकाणची उपलब्ध साहित्य हि केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या अक्षरश्या हागणदारी व उकीरड्यावरती गावकोसाबाहेर ठेवण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणचे इन्व्हरटर मशीन हे समितीच्या घरीच प्रकाश देत असल्याचे समोर आले आहे. पाणलोट व्यवस्थापन अंतर्गतचीकामे अतिशय दर्जाहीन झाल्याची ओरड तालुक्यातील जनतेतून होत आहे. तालुका कृषी अधिकारी दावलबाजे हे नांदेड सारख्या ठिकाणी राहून अपडाऊन करतात. तर आठ -आठ दिवस कार्यालयात हजार राहत नाहीत, हजार राहिल्यास शेतकऱ्यांचे कामे वेळेवर करीत नसल्याचे अनेकदा उजेडात आले आहे. त्यांच्या मनमानी कारभार चालवून " हम करे सो कायदा...या उक्तीप्रमाणे सर्व काही प्रकार अलबेलपणे सुरु आहे. वरील सर्व प्रकाराकडे वरिष्ठांनी तात्काळ लक्ष देवून झालेल्या जनजागृती कार्यक्रम व साहित्याची जायमोक्यावर जावून चौकशी करावी तसेच यातील दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

जुन्याचा समितीच्या नावाखाली भ्रष्टाचार

महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग शसन निर्णय मंत्रालय मुंबई ने निर्गमित केलेल्या पाणलोट समितीच्या रचनेत फेरबदल करण्याचा घेतलेला शासन निर्णय तालुका कृषी अधिकारी कार्यालयात देण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्यातील पाणलोट व्यवस्थापन समितीची नव्याने निवड न करताच जुन्याच समितीच्या नावाखाली निधीचा दुरुपयोग केला जात आहे. चक्क शासनाच्या निर्णयाला बगल देत येथील जबाबदार कृषी अधिकार्यांनी समितीच्या नावाखाली लाखो रुपयाचा निधी गिळंकृत करण्याचा सपाटा लावल्याची चर्चा सुरु असून, त्यांच्यावर कार्यवाही व्हावी. आणि नव्याने समित्यांची सथपन करून शासकीय निधीचा योग्य रित्या विनियोग होवून पाणलोट कार्यक्रमाचा दर्जा राखल्या जावा अन्यथा विकास प्रेमी नागरिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयास कुलूप ठोकण्याच्या तयारीत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी