नांदेडात राष्ट्रवादीला खिंडार

नांदेडात राष्ट्रवादीला खिंडार;
राष्ट्रवादीचे उत्तर विधानसभा अध्यक्ष सुशीलकुमार चव्हाण असंख्य कार्यकर्त्यासह `आप` मध्ये

नांदेड(प्रतिनिधी)राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील घराणे शाहीच्या पार्श्वभूमीवर अंगी कर्तुत्व असतानाही महत्वाच्या पदापासून ते महत्वाच्या कामापर्यंत नेहमीच दूर ठेवणाऱ्या खर्या कार्यकर्त्याची होणारी परवड राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या आज मुळावर आली एक उत्कृष्ट व कुशल तसेच संघटन कौशल्य असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नांदेड उतर चे विधान सभा अध्यक्ष सुशीलकुमार चव्हाण यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह आज आम आदमी पक्षामधे प्रवेश केला.राष्ट्रवादी कॉंग्रेस ला नांदेड मध्ये मोठे खिंडार पडल्याचे मानले जात आहे.

नांदेड येथील शासकीय विश्राम ग्रहात आयोजित पत्रकार परिषदेत सुशील कुमार चव्हाण यांनी राष्ट्रवादीला `रामराम` ठोकत आम आदमी पक्षात आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह अधिकृत प्रवेश करीत असल्याची घोषणा केली. श्री चव्हाण यांनी गत दोन वर्षा पासून राष्ट्रवादीचे उत्तर विधानसभा अध्यक्ष म्हणून उत्क्रुस्त कामगिरी बजावली होती.त्यांच्या कार्याची दखल मुंबई पातळीवर देखील घेण्यात आली होती.राष्ट्रवादी च्या सभासद नोंदणी मध्ये चव्हाण यांचे योगदान महत्वाचे होते दि .३ फेब्रुवारी २०११ मध्ये त्यांनी शिवनगर या अति दुर्लक्षीत भागाच्या विकासासाठी ५५ कार्यकर्त्यासह आंदोलन केले होते ते आंदोलन सबंध राज्यभर चर्चेचा विषय ठरले होते.परिणामी सदरील भागाच्या विकासकामांना गती आली.भिक मांगो आंदोलन,पूरग्रस्तांना अनुदान, शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध आंदोलने केली.म.न.पा.२०१२ च्या निवडनुकीत प्रचार न करता केवळ अंगी असलेले संघटन कौशल्य तसेच लोकप्रियता यांच्या बळावर त्यांच्या पत्नी श्रद्धा चव्हाण यांना बहुमताने निवडून मनपा.मध्ये पाठविले. व गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी या निमित्ताने प्राप्त झाली. ज्या पक्षाला आपण मनापासून मानतो अशा पक्षात जीव ऒतुन काम करण्याची शिकवण आपल्या वडिला कडून मिळाली आहे.त्यानुसार मी देखील काम करीत असताना पक्षातिल काही वरिष्ठाकडून मला सहकार्य मिळाले नाही उलट आपला आमदार काही नांदेड मध्ये नाही त्यामुळे आपण जास्तीचे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही असे शहाणपणाचे बोल वेळोवेळी यैकावयास मिळाले.तर खर्या कार्यकर्त्यांना न्याय न देता एकाच घरात राष्ट्रवादी पक्ष बांधून ठेवण्याचे काम होत आहे.कार्यतत्पर असलेला व्यक्ती दुर्लक्षीत राहतो त्यामुळे माजी कोंडी होऊन राष्ट्रवादी पेक्षा सर्व्समन्यच आम आदमी पक्ष मला अधिक जवळचा व चांगला वाटला.त्यामुळेच मी `आप` मध्ये प्रवेश करीत असल्याचे सुशीलकुमार चव्हाण यांनी सांगितले.

राष्ट्रवादी मध्ये असल्याने कॉंग्रेस च्या विविध घोटाळ्याची माहिती असूनही मला त्या विरुद्ध आवाज उठविण्याची परवानगी नव्हती त्यामुळे माज्या मनाची नेहमीच घुसमट झालेली आहे.आता मात्र एका निर्मळ तसेच स्वछ प्रतिमेच्या पक्षात जात असल्यामुळे मला न्याय मिळत आहे.भविष्यात कॉंग्रेस,व राष्ट्रवादी या पक्षाने केलेल्या नियमबाह्य कामाचा लेखाजोखा मी जनते समोत ठेवीन .यावर जन्तेनिच काय तो निर्णय घ्यायचा आहे.यापूर्वी दि . ४फेब्रुवारी २०१४ रोजी मुंबई येथे पक्षाचे जेष्ट नेते मयंक गांधी यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झालेला आहे.यावेळी महाराष्ट्राच्या संयोजिका अंजली दमानिया व आम आदमी पक्षाच्ये महत्वपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते.सुशील चव्हाण यांच्या सोबत राष्ट्रवादी उत्तर विधान सभेचे उपाध्यक्ष तसेच नांदेड जिल्हा नाभिक महामंडळाचे माजी जिल्हा सचिव माधव सजणे,राष्ट्रवादी उत्तर विधान सभेचे सरचिटणीस व शिंपी समाजाचे कोषाध्यक्ष रमेश गटलेवार,सिव्हिल लेबर कॉन्त्रक्टर असोसिएशन चे अध्यक्ष शेख रशीद,सरचिटणीस शेख अन्सार,शेख शमीम, गजानन सूर्यवंशी,शैलेश टाक,पवन राठोड, धम्मपाल जोंधळे,बलजित सिंघ ठाकूर, बालाजी कदम,सत्यनारायण जक्कन,राम सिंघ,राष्ट्रवादी उत्तर विधान सभेच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतल्याचे याप्रसंगी जाहीर करण्यात आले.

आम आदमी पक्षाचे ध्येय धोरणे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम निस्वार्थ पणे करून जिल्ह्याचे संयोजक नरेंद्र सिंघ ग्रंथी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढविण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यासह काम करण्यास नेहमीच तत्पर राहू अशी ग्वाही श्री चव्हाण यांनी दिली. या पत्रकार परिषदेत सुशीलकुमार चव्हाण यांच्या नेर्तुत्वात श्री ग्रंथी यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.यावेळी आम आदमी चे मोहनदास जहागीरदार,संजीवकुमार जिंदल,शारेख अहमद, तारेख अहमद, शिवाजी पांढरे,प्रशांत कौठेकर,फारुख अहमद,संदीप इरलावाड,शीतल मुंडे,आणि रितेश पाडमुख यांच्या सह आम आदमीचे पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्त्याची उपस्थिती होती.

सुशीलकुमार चव्हाण यांच्या सारख्या हाडाच्या व सच्च्या कार्यकर्त्याने आम आदमी पक्षात प्रवेश केल्याने नांदेड जिल्ह्यात `आप` आता सर्वांचा बाप आता नक्कीच बनणार असेच काहीसे चित्र या निमित्ताने समोर आले आहे. तर प्रामाणिक पक्ष म्हणून `आप`ची ऒळख सर्वसामान्य नागरिकांच्या मनात होत आहे हे तितकेच खरे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी