डी.बी. पाटील स्वग्रहि परतण्याच्या तयारीत

माजी खा.डी.बी. पाटील स्वग्रहि परतण्याचे संकेत... गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत सुतोवाच 



लोहा(हरिहर धुतमल)नांदेडचे माजी खा. तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डी.बी. पाटील हे स्वग्रहि म्हणजे भारतीय जनता पक्षात परतणार असे संकेत मिळाले असून, माळाकोळी( ता.लोहा) येथील बारज्योतिर्लिंगाच्या साक्षीने त्यांनी भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समोर सांगितले. माझ्या राजकीय जीवनाचे गोपीनाथराव हे शिल्पकार असून, कोणतीही अपेक्षा न ठेवता सोबत काम करायला तयार आहे. असे माजी खा. डी.बी. पाटील जाहीरपणे सांगितल्याने खा.मुंडे यांनीही त्यांना समावून घेत नांदेडची उमेदवारी देण्याचे सुतोवाच केल्याने राजकीय उलथपलथिला सुरुवात झाल्याचे यावरून दिसून येत आहे.

निमित्त होते लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे बाराजोतिर्लिंग मंदिराच्या ४० लक्ष रुपयाच्या सांस्कृतिक सभागृहाच्या लोकार्पण व नागरी सत्कार सोहळ्याचे. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या भव्य मंगलकार्यालयाचे भूमिपूजन भाजपचे नेते खा.गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते पार पडले. 
माळाकोळी येथे येण्यापुर्वीच नांदेडच्या विमानतळावर भाजपचे जिल्ह्यातील नेते मंडळी  गोपीनाथराव मुंडे यांच्या स्वागताला उपस्थित होते. माळाकोळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व्यासपीठावर आहेत, आपण जावू नये असे शिवसेनेच्या एका पदाधिकार्यांनी सांगितले. परंतु त्यावर खा.मुंडे यांनी माझ्या भावाच्या जावयाचा हा कार्यक्रम आहे. एक भाऊ दूर गेला दुसरा दूर करणार नाही. डी.बी. तर भाजपातच येणार आहेत. असे विमानतळावर सांगताच उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या सर्वांचे चेहरे पडले होते.

माळाकोळीत माजी खा.डी.बी.पाटील माजी आ.प्रताप पाटील चिखलीकर, माजी आ.पाषा पटेल, यांनी सांस्कृतिक सभागृहासाठी निधी दिला होता. म्हणून त्यांचाही नागरी सत्कार या ठिकाणी ठेवण्यात आला होता. डी.बी.पाटील आपल्या भाषणात म्हणाले कि, गेल्या वर्षभरापासून मी बेचैन आहे. माझ्या वीस वर्षाच्या राजकीय जीवनाचे शिल्पकार गोपीनाथराव आहेत. त्यांच्यामुळे मी आमदार, मंत्री, खासदार झालो. मी कुठे हि असलो तरी मुंडे साहेबांच्या शब्दाच्या बाहेर नाही. त्यांनी कशीही वागणूक दिली तरी मी सोबतच राहील स्वच्छ राजकारण साहेबांच्या हाथाखाली केले आहे. महील निवडणुकीत बीड मध्ये प्रचाराला होतो, आता बेचैन आहे. सोबत काम करणार आहे, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. माजी आ.पाषा पटेल यांनी मी साहेबांच्या सोबतच आहे, कुठेही गेलो नाही, डी.बी.पाटील तुम्ही गेलात पण पुन्हा यायचे तुमचे मन झाले .. साहेब तुम्हाला समावून  घेतील असे बोलायला विसरले नाहीत...(हशा)   

खा.गोपीनाथ मुंडे यांनी डी.बी.पाटील यांना आम्ही लवकरच समावून घेवू, मी कोणत्याही कार्यकर्त्यांना खाली ठेवत नाही, तुम्ही चिंता करू नका असे सांगून नांदेड लोकसभा मतदार संघात आता डी.बी.पाटील हे उमेदवार असतील असे संकेत दिले आहे.

माळाकोळी गाव शिखर करणाऱ्या शिल्पकारांचे आहे..यंदा मंत्रालयावर कळस चढवायचा आहे. या परिवर्तनाच्या लढाईला तुम्ही सज्ज रहा असे, आवाहन खा.मुंडे यांनी केले. दिवस चांगले आहेत, लातूर मध्ये तर २० जन लाईन आहेत. तेंव्हा तरुणांनी आता सोबत राहावे असे संगितले. यावेळी व्यासपीठावर माजी आ.गोविंद केंद्रे, माजी आ.विजय गव्हाणे, माजी. आ.रोहिदास चव्हाण, माजी आ.बब्रुगन खंदारे,  माजी आ.टी.पी.कांबळे, जिल्हाध्यक्ष राम पाटील रतोळीकर, प्रा.मनोहर धोंडे, रमेश अप्पा कराड, डॉक्टर सुनील गायकवाड, चैतन्य बापू देशमुख, संस्थांचे अध्यक्ष सखाराम मेंडके, माजी आ.गंगाधर ठक्करवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी