शेतकऱ्याची आत्महत्या..

कर्जबाजारी युवक शेतकऱ्याची आत्महत्या.. 



हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील मौजे धानोरा ज. येथील एका युवक शेतकर्याने आत्महत्या केल्याची घटना दि.२२ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत हिमायतनगर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यापासून धानोरा ज. गावातील हि तिसऱ्या शेतकऱ्याची आत्महत्या होय. 

विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा नदी किनारी असलेल्या तालुक्यातील धानोरा ज. येथील अल्पभूधारक मयत शेतकरी अर्जुन लक्ष्मण पतलेवाड वय २६ वर्ष यांनी खरीप हंगामात भारतीय स्टेट बैन्केकडून कर्ज काढून शेतीत पेरणी केली होती. परंतु मुसळधार पाऊस व नदी, नाल्याला आलेल्या पुराने शेतातील पिके पाण्यात होती, त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. तसेच बैन्केकडून काढलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत तो नेहमी असायचा. दि.२२ रोजी याच चिंतेने बेचैन झालेल्या अर्जुनने शेतातील विषारी औषध प्राषण करून जीवन यात्रा संपविली. हि बाब घरच्यांना समजताच तातडीने त्यास येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येवून विषारी औषधाचा प्रभाव जास्त झाल्याने तातडीने नांदेडला पाठविण्यात आले होते. परंतु सोनारी फाट्यानजीक जाताच युवक शेतकऱ्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या मृत्यू पश्चात आई, वडील, भावू, भावजयी, पत्नी असा मोठा परिवार आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याच्या परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला असून, यातून सावरण्यासाठी शासनाने कुटुंबियांना मदतीचा हाथभार लावावा अशी मागणी गावकऱ्यामधून व्यक्त होत आहे. शेतकऱ्याच्या अकाली मृत्यूमुळे धानोरा ज. गावावर शोककळा पसरली असून, शनिवारी सायंकाळी उशिरा युवक शेतकऱ्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.      
      

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी