कार्यकर्त्यांची नाराजी आ. जवळगांवकरांना भोवणार...

निष्ठावंत कॉंग्रेस कार्यकर्त्यांची नाराजी आ. जवळगांवकरांना भोवणार...
हिमायतनगरात कॉंग्रेस आणि आप एकाच घरात...।



हिमायतनगर(अनिल मादसवार)लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी चालु असुन, शिवसेना, भाजप, कॉंग्रेस व राष्ट्रवादी मध्येच सरळ लढत होणार असली तरी हिंगोलीची जागा कोणाची यावर राष्ट्रवादी व कॉंग्रेस मध्ये खल सुरु आहे. लोकसभा निवडणुकीवर टोकाची चर्चा सुरु असतांना विधानसभेचीही चर्चा जोरकसपने होतांना दिसुन येत आहे. विधानसभेच्या निवडणुका लांबणीवर असतांना कॉंग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील नाराज कार्यकर्त्यांचा गट तयार झाला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यंाचीकदर करण्यात आ. जवळगांवकर अयशस्वी झाले असल्याने आगामी विधानसभेचा निवडणुकीत आ.जवळगांवकर कॉंग्रेसचे उमेदवार राहीलेच तर त्यांना निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी भोवणार असल्याचे जाणकारातुन बोलले जात आहे.

हदगांव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघ तसा शिवसेनेचा बालेकील्ला राहीला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक पर्वामुळे या तटबंदी बालेकील्याला कॉंग्रेसने सुरुंग लावला. यामध्ये आ.माधवराव पाटील जवळगांवकरांचा आमदार म्हणुन उदय झाला. जवळगांवकर अशोक पर्वाने विक्रमादीत्य ठरले खरे, परंतु सत्येच्या सारीपाठात खरे कोण आणि खोटे कार्यकर्ते कोण..। जवळचा आधिक कोण याची पारख आमदारांना राहीली नसल्याने भवीष्यात त्यांच्या विरोधात कॉंग्रेस पक्षातील नाराजांचा मोठा गट तयार झाला आहे. आमदार जवळगांवकरांनी केलेली विकास कामे ही त्यांच्याच मागेपुढे पळणा-या चांडाळ - चौकडीकडुन केली जात असल्याने विकास कामांचा दर्जा पुरता ढासळला आहे. त्यामुळे येणारा काळ आ.जवळगांवकरांसाठी पश्‍चातापाचा असेल असे सुजाननागरीकांतुन बोलल्या जात आहे. 

हिमायतनगरात कॉंग्रेस आणि आप एकाच घरात           

केजरीवालांचा आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेस पक्षाचे राजकीय सख्य सर्वश्रुत असतांना हिमायतनगरात मात्र वेगळी प्रचीती येतआहे. एकाच घरातील दोन सख्खे भाऊ मोठे भाऊ कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावंत तर धाकटे आम आदमी पक्षाचे दिल्लीत परस्पर विरोधकअसले तरी, येथे मात्र आपन दोघे भाऊ भाऊ सार काही मिळुन खाऊ असेच चित्र राठोड बंधुचे दिसुन येत आहे. 

दरेसरसम येथील राठोड बंधु हे पुर्वीपासुनच कॉंग्रेसशी व आ. जवळगांवकरांशी एकनीष्ठ म्हणुन ओळखले जातात. यातील जेष्ठ बंधु सुभाष आला राठोड हे कै.आ.निवृत्ती पाटील जवळगांवकर यांच्यावर नित्तांंत श्रध्दा असलेले व त्यांच्या नंतर कै.पंजाबराव पाटील यांच्या कर्तत्वाने प्रभावीत होऊन कार्य करणारे निष्ठावान म्हणुन ओळखले जातात. त्यांच्या नंतर विदयमान आ.माधवराव पाटील जवळगांवकर यांचे ते खांदे समर्थक, पडत्या काळात माधवराव पाटलांच्या मागे समर्थपने उभे राहुन साथ देणारे सुभाष राठोड यांना जवळगांवकरांनी आपल्या आमदारकीच्या काळात मागील काळातील कोनतीही उणीव न ठेवता भरभरुन दिले. आज ते कॉंग्रेस पक्षाचे सरसम जि.प.गटातील विदयमान जि.प.सदस्य आहेत. कोट्यावधी रुपयांच्या विकासाची कामे त्यांच्या हातुन केली जात असुन, तांड्यातील एका सर्वसामान्य कुटूंबात जन्मलेल्या सुभाष राठोड यांना जवळगांवकरांमुशळे संपुर्ण जिल्हा ओळखत आहे. 

तर धाकटे बंधु दिलीप आला राटोड हे सिप्रा सामाजीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचीव...वास्तवीक पाहता त्यांचा आणि राजकीय पक्षाचा चार वर्ष कोनताही संबंध नसतो. हिमायतनगर तालुका आणि परिसरात त्यांच्या संस्थेचे कार्य उल्लेखणीय आहे. चार वर्ष कोनत्याही राजकीय पक्षाशी संबंध न ठेवणारे दिलीप राठोड मात्र निवणुकीच्या काळात सेवेची संधी न सोडता कोणत्या तरी पक्षाशी जुळउन घेत कधी कॉंग्रेस, कधी बसपा, तर इतर पक्षाच्या प्रचाराला लागतात हे त्यांचे कसबच होय. आता मात्र दिलीप आला राठोड हे आम अदमी पक्षात प्रवेश करुन हिंगोली लोकसभा मतदार संघातुन आपच्या तिकीटावरुन निवडणुक लडवीण्याच्या तयारीत आहेत. कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या काळात झालेला भ्रष्टाचार पुसुन काढण्यासाठी हिमायतनगर शहरात झाडु रँली काढुन भ्रष्टाचाराने बरबटलेली व्यवस्था झाडुने साफ करण्याचा प्रयत्न केला.परंतु राठोड बंधुचे हे देखावे केवळ नाटक असल्याच्या प्रतीक्रीया इतर पक्षातील अनेक पदाधीका-यांनी व्यक्त केल्या आहेत. कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात बेंबीच्या देठापासुन दिल्लीत आरडणा-या आपच्या कार्यकर्त्यांचा मात्र येथे होत असलेल्या विकास कामाच्या बाबतीत गळा बसल्याचे दिसुन येत आहे. येथे काम करणारेही आपलेच आणि सांभाळणारे आप आपलेच...असल्याने राठोड बंधुचे हे आपण दोघे भाऊ भाऊ सार काही मिळुन खाऊ हे गणीत जुळलेल्या दिसत असल्याच्या प्रतीक्रीया राजकीय विश्‍लेषकाकडुन एैकवीत येत आहेत.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी