अंगणवाडीच्या मुलाखती अचानक रद्द

अध्यक्ष - सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे अंगणवाडीच्या मुलाखती अचानक रद्द, अर्थकारणासाठी पुरेसा अवधी मिळावा म्हणून नवी शक्कल../ 


हिमायतनगर(अनिल मादसवार)एकात्मिक बाल विकास योजनांच्या माध्यमातून हिमायतनगर तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस, मिनी अंगणवाडीच्या एकूण २३ जगांच्या रिक्त पदासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. या संदर्भात दि.२८ रोजी पंचायत समिती कार्यालयात मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे प्रस्ताव दाखल केलेल्या १०० हून अधिक महिला चिमुकल्या सह पतिराजांना घेवून तहसील आवारात आल्या होत्या. परंतु अचानक मुलाखती रद्द करण्यात आल्याने उलट -सुलट चर्चेला उधान आले आहे. या प्रकारामुळे आर्थिक उलाढालीतून खर्या व गुणवत्ता पूर्ण लाभार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता बळावली आहे. 

तालुक्यातील अंगणवाडी सेविकेच्या ०३ जागेसाठी १६, मदतनीसांच्या १३ जागेसाठी तब्बल ६८ महिलांनी प्रस्ताव दाखल केले होते. मिनी अंगणवाडीच्या ०७ जागेसाठी १७ महिला असे एकूण २३ जागेसाठी १०० हून अधिक प्रस्ताव दाखल झाले होते. अर्ज दाखल करताना अगदी शुल्लक कारणावरून लाभार्थ्यांना छालाण्याची संधी येथील बालविकास प्रकल्प कार्यालयातील पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी यांनी सोडली नाही. त्यामुळे " भिक नको पण कुत्रे आवर "  असे म्हणायची वेळ अनेक इच्छुक उमेदवारावर आली. अनंत अडचणीचा सामना करत प्रस्ताव दाखल केले, अर्जाच्या छाननीत आपली पोळी भाजण्याच्या उद्देशाने निवड समिती व अधिकार्यानि संगनमताने बहुतांशी महिलांचे अर्ज रद्द केल्याची ओरड होत असून, तश्या काही तक्रारी वरिष्ठ स्थरापार्यंत पोचल्या आहेत. यात आपल्या मर्जीतील उमेदवाराची निवड करण्याचा खटाटोप संबंधितानी केला असून, मुलाखतीचे ऑर्डर हाती देण्यासाठी सुद्धा भाव ठरविण्यात आल्याचे एका लाभार्थ्याने खाजगीत बोलताना सांगितले. हा सर्व प्रकार निवड समितीच्या संगनमताने केलाजात असल्याने अनेकांना विद्यमान अध्यक्षांची मनधरणी करावी लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या सर्व रिक्त जागेवरील महिलांची निवड भरती प्रक्रियेत अनेकांवर अन्याय होण्याचे चित्र दिसून येत आहे. 

आज दि. २८ शुक्रवारी रिक्त पदाच्या भरतीसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु आपल्याच्या नातेवाईकांची तथा राजकीय क्षेत्रातील हितसंबंधातील महिलांची वर्णी लावण्यासाठी विद्यमान निवड समितीच्या पदाधिकारी व अधिकार्यांना जाणीवपूर्वक मुलाखती रद्द करून आपला उद्देश सध्या करण्याचा खटाटोप सुरु केल्याचे मुलाखतीस येउन परतलेल्या काहींनी नांदेड न्युज  लाइव्हशि बोलताना सांगितले. याबाबत माहिती घेतली असता निवड समितीचे अध्यक्ष - सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे अंगणवाडीच्या मुलाखती रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

राजकीय वरद हस्त प्राप्त काही दलालांनी निवड समितीच्या पदाधिकार्यांना हाताशी धरून अर्थकारणाला पुरेसा अवधी मिळावा म्हणून आजच्या मुलाखती रद्द केल्या. तसेच गुणवत्तेचे सर्व नियमधाब्यावर ठेवून रिक्त पदे भरण्याची तयारी सुरु केल्याच्या संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी यावेळी बोलून दाखविल्या आहेत. यामुळे खर्या व गरजू महिला शैक्षणिक गुणवत्ता असताना वंचित राहणार असून, या मनमानी निवड प्रक्रियेत वरिष्ठांनी लक्ष देवून गुणवत्ता पूर्ण भरती प्रक्रिया पार पाडावी अशी मागणी होत आहे. 

याबाबत बालविकास प्रकल्प अधिकारी श्री भिसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी दूरध्वनी बंद करून ठेवला.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी