मनपा स्थायी समितीच्या बैठक

व्यापारी संकुल, महाराणा प्रतापसिंह पुतळा सुशोभिकरणाच्या निवीदांना मंजुरी
मनपा स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा

नांदेड(अनिल मादसवार)हिंगोली गेट परिसर आणि बंजारा हॉस्टेलच्या जागेत महापालिकेचे व्यापारी संकुल उभारण्यासह हिंगोली नाका परिसरात महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळा सुशोभिकरण व इतर विविध विकासकामांच्या निविदांना महापालिका स्थायी समितीच्या आज मंगळवारी (दि.4) झालेल्या सभेत मंजुरी देण्यात आली. विषयपत्रिकेवरील 30 विषय व एक अपील समितीने एकमताने मंजुर केले.

मनपा स्थायी समितीचे सभापती उमेश पवळे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता सभेला सुरुवात झाली. सभेला सदस्य स. सरजितसिंघ गील, गफ़ार खान, विनय पाटील -गिरडे, अशोक उमरेकर, स. गुरमितसिंघ नवाब, किशोर यादव, शंकर गाडगे, हबीब बागवान, हबीब बावजीर, सदस्या श्रध्दा चव्हाण, मोहिनी कनकदंडे, शांता मुंडे, वाजेदा तब्बसूम, लतिफ़ा बेगम, हसीना बेगम साबेर चाऊस, उपायुक्त राजेंद्र खंदारे, विद्या गायकवाड, नगरसचिव पी. पी. बंकलवाड यांच्यासह महापालिकेचे अन्य अधिकारी विभागप्रमुख उपस्थित होते.

विषयपत्रिकेवरील भूमिगत ग़टारासाठी आर. सी. सी. फ़्रेम कव्हर पुरवठा करणे, सैन्य भरतीच्या व्यवस्थेसाठी नियोजन, महाराणा प्रतापसिह पुतळा सुशोभिकरणाच्या वाढीव खर्चाला मंजुरी, जंगमवाडी भागातील रस्त्याचे काम, कामाच्या शिर्षात बदल, आयडीएसएमटी योजनेतंर्गत हिंगोली गेटवरील डीपी साईट नं. ए आणि आरक्षण क्र. 105 बंजारा हॉस्टेल येथे दुकान केंद्राचे बांधकाम करणे तसेच क्लब हाऊस ते डंकीनकडे जाणारा सिमेंट रस्ता तयार करण्याच्या निविदांना मंजुरी प्रदान करण्यात आली. विद्युत विभागाची विविध कामे तसेच काही अन्य कार्योत्तर कामांना मान्यता देण्यात आली. तरोडा भरती प्रकरणात कर्मचा-याने स्थायी समितीकडे केलेले अपील मंजुर मान्य करण्यात आले.

सभेत विविध विषयावर चर्चा झाली. महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणाचे काम लवकर पूर्ण करावे, अशी सूचना सभापती पवळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली. चांद मस्जीद परिसरातील दारुल उलुमवरील नाली एका खाजगी व्यक्तीने बंद केल्यामुळे त्यावर तोडगा काढावा, आचारसंहितेपुर्वी सदस्यांनी सुचविलेल्या कामांच्या निविदा व कार्यारंभ आदेश द्यावे, तातडीच्या कामांच्या आर्थिक मंजुरीचे प्रस्ताव दाखल करताना त्याची योग्य छाननी केली जावी, राजीव गांधी आवास योजनेची कामे लवकर सुरु करावीत, रहेमतनगर व ईश्वरनगर भागातील बीएसयुपीच्या प्रलंबित कामे लवकर पूर्ण करावी, तरोड्यातील रस्ते व नाल्यांसाठी निधी द्यावा बीएसयुपी घरकुलांचे काम लवकर मार्गी लावण्यासाठी सर्वांचा सहभाग घ्यावा, अशा विविध सूचना सदस्यांनी करुन चर्चेत सहभाग घेतला. सदस्यांच्या सूचना लक्षात घेऊन प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश सभापतींनी दिले.

चर्चेला उत्तर देताना प्रशासनाच्या वतीने तातडीचे विषय कमी आणि सदस्यांच्या मागणीप्रमाणे केलेल्या कामांशी संबधित असतात तसेच राजीव गांधी आवास योजनेचा आराखडा पाठवला आहे, मंजुरीनंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी