संचालकांची गळती...?

चेअरमनच्या एकाधिकार शाहीला कंटाळून संचालक राजीनाम्याच्या वाटेवर   
गळीत हंगाम संपण्यापूर्वी वसंत कारखाण्याच्या संचालकांची गळती...? 


हिमायतनगर(अनिल मादसवार)विदर्भ - मराठवाड्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांच्या कार्यक्षेत्रावर चालणारा पोफळीचा " वसंत सहकारी साखर कारखाना " सध्या चेअरमनच्या एकाधिकारशाही कारभारामुळे चर्चेत आला आहे. नुकतेच प्रदीप देवसरकर यांनी संचालक पदाचा राजीमाना दिला असून, त्यांच्या पाठोपाठ हदगाव - हिमायतनगर तालुक्यातील व्होईस चेअरमनसह चारही संचालक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती शिऊरचे संचालक रामराव देशमुख यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना दिली. त्यामुळे गळीत हंगाम संपण्यापूर्वी वसंत कारखाण्याच्या संचालकांची गळती होण्याची चिन्हे दिसत आहेत.

हदगाव - हिमायतनगर, पुसद, मुळावा, महागाव, उमरखेड, ढाणकी, या भागातील कार्यक्षेत्रातील उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी  उभारण्यात आलेल्या " वसंत सहकारी साखर कारखाना " पोफळीची गत सार्वत्रिक निवडणूक आ. माधवराव पाटील व माजी आ.प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाली. या निवडणुकीत हदगाव - हिमायतनगर भागातून - ४, पुसद भागातून - ४, महागाव भागातून - ४, ढाणकी भागातून ४, उमरखेड -४ व अनुसूचित जाती जमातीतून ३ असे एकूण २३ जणांना उमेदवारी देण्यात आली होती. कारखाना निवडणुकीसाठी खा.सुभाष वानखेडे व नागेश पाटील आष्टीकर यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यांच्या पैनलचा सफाया झाला, हि निवडणूक जिंकण्यासाठी आ.जवळगावकर यांनी प्रयत्न करून निर्विवाद विजय मिळविला. यासाठी विद्यमान चेअरमन प्रकाश देवसरकर यांचा विजय मिळविण्यात जेवढा वाटा आहे, त्यापेक्षा अधिक वाटा आ.माधवराव पाटील यांचा देखील आहे. निवडणुकीच्या नंतर व्हाईस चेअरमन पद हिमायतनगर भागाला मिळाले व तीन संचालक पदावर विराजमान झाले. त्यामुळे हदगाव - हिमायतनगर तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. कारखान्याच्या माध्यमातून आपला व आपल्या कुटुंबाचा आर्थिक विकास होईल असे वाटत होते. परंतु व्हाईस चेअरमन व तीन संचालक नामधारीच ठेवण्याच्या उद्देशाने कारखान्याच्या निर्णय प्रक्रियेत संचाला व व्हाईस चेअरमन यांना महत्व न देता " वसंत " कारखाना म्हणजे आपली खाजगी मालमत्ता असल्यासारखे वागून संचालकांना वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. परिणामी कारखान्याच्या संचालकात तीव्र नाराजी पसरली असून, या नाराजीतून शिऊरचे संचालक रामराव देशमुख हे राजीनामा देण्याच्या वाटेवर असून, कारखान्यात सुरु असलेला संचालक मंडळातील गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.

यापूर्वी वसंत सहकारी कारखान्याचे संचालक शरद पुरी यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला होता, परंतु त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नसल्याच एसमजते. 

याबाबत कारखान्याचे चेअरमन प्रकाश पाटील देवसरकर यांच्याशी संपर्क केला असता, त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने संपर होवू शकला नाही.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी