प्रभुरामचंद्र व लक्ष्मण सख्यांची छबी

रामचंद्राच्या गीताने शहरवासीय मंत्रमुग्ध  



हिमायतनगर(अनिल मादसवार)माघ शुक्ल ४ दि.०३ सोमवार गणेश चतुर्थीचा दिवशीची सकाळच्या रामप्रहरी  तन के तंबुरे में जो संसो के तार बोले..जय सिया राम राम.. जय राधे श्याम श्याम... या प्रभू सियारामांच्या गीत शहरवासीयांच्या कानी पडले.. दुकान - घराबाहेर पाहताच काय..? साक्षात प्रभुरामचंद्र व लक्ष्मण या सख्यांची छबी उभी असल्याचे दिसून आले. असाच काहींसा अनुभव आला असून, त्यांच्या सोबत असलेल्या तबला व पेटीवादक या दोघांच्या ताल - सुरांच्या संगमाने शहरवासीय  मंत्रमुग्ध झाले होते.

शासन कलाकारांसाठी विविध प्रकारच्या योजना आमलात अनीत असले तरीसुद्धा परंपरागत कलावंत या योजनांपासून वंचित आहेत. परिणामी आंध्रप्रदेश - कर्नाटक सीमारेषेवरील बहुतांश कलावंत टीचभर पोटासाठी विविध प्रकारची वेशभूषा परिधान करून भटकंती करताना दिसून येत आहे. खानदानी, परंपरागत प्राप्त झालेली कला दाखवून पोटाची खळगी भरणारे काही कलावंत गणेश जयंतीच्या पर्वावर मराठवाड्यात दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील विविध तालुक्यात या शोषितांचे नातेवाईक विविधांगी देवी - देवतांची रूपे साकारून नागरिकांनचे भक्तिगिततुन मनोरंजन करीत उपजीविका भागवीत आहेत. दि.०३ रोजी हिमायतनगर शहरातील नागरिकांना प्रत्यक्ष प्रभू राम -लक्ष्मण अवतरल्याचा अनुभव आला आहे. कर्नाटक राज्यातील बेल्लेरि येथील मूळ रहिवाशी असलेल्या रामलीला भजनी मंडळाचे प्रमुख श्री परशुराम ह्या ३५ वर्षीय युवकाने प्रभू रामचंद्राची भूमिका तर राजू या ३० वर्षीय युवकाने लक्ष्मणाची भूमिका साकारून गावातील घरोघरी तसेच दुकानदार यांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांच्या सोबत तबलावादक म्हणून शंकरांना व पेटीवर तालसुराची साद मंजू याने दिली. त्यांच्या मंजुळ आवाजाने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, रामचंद्राच्या विविध गीतांना गावकरी भारावून गेले आहेत. पोटासाठी वर्षातील ०३ महिने आंध्रप्रदेशातील निझामाबाद, आदिलाबाद, करीमनगर, जगतीयाल, बोधन व तीन महिने महाराष्ट्रातील नांदेड, परभणी, औरंगाबाद आदी जिल्ह्यात भटकंती करतो, आमच्या गीतांना खुश होवून अनेक जन मदद्त करतात, परंतु शासनाच्या योजना व सुविधा लाभ आम्हाला मिळत नाही अशी खंत त्यांनी नांदेड न्युज लाइव्हशी बोलून दाखविली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी