१३ " जणांवर " गुन्हे दाखल

१७ लाखाचा मुद्देमाल जप्त... १३ " जणांवर " गुन्हे दाखल

हिमायतनगर(अनिल मादसवार)नांदेड - किनवट राज्य रस्त्यावरील सदगुरु खव्वा सेन्टरवर काल काळ्या बाजारात नेण्याच्या उद्देशाने शालेय पोषण आहारचे धान्य उतरविताना पोलिसांनी वाहनचालकांसह तिघांना रंगेहाथ पकडले होते. याबाबत दि.१५ रोजी रात्री १०.३० च्या सुमारास तीन वाहन चालकांसह १० " जणांवर " पोलिस स्थानकात जीवनावश्यक वस्तूच्या कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या कार्यवाहीमुळे एकच खळबळ उडाली असून, धान्याचा काळा बाजार करू पाहणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

यातील प्रमुख सूत्रधार हा चार जिल्ह्यांचा शालेय पोषण आहाराचा पुरवठाधारक गुत्तेदार प्रदीप चाडावार, वाहतूकदार गिरिधर मदरेवार, खवा सेंटर मालक शंकर देशमुख, माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य सुनील वानखेडे व तीन ते चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ट्रक चालक शिवाजी तोंडसुरे, अशोक सुरनर, बालाजी पंढरीनाथ येरनाडे, यांना अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधारासह बडे मासे पोलिसांना गुंगारा देवून पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. सदरील घटनेचा तपास पोलिसांनी योग्य रीतीने केल्यास अजूनही काही प्रतिष्ठित दलाल पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता बळावली आहे.

विशेष म्हणजे घटनास्थळी ताब्यात घेण्यात आलेला शालेय पोषण आहाराचा माल खावा सेंटर वरून गाडीत लोड करण्यासाठी यातील आरोपी असलेले सुनील वानखेडे यांनीच पोलिस, पत्रकार व नागरिकांच्या समक्ष हमाली देवून कर्तव्य दक्षता निभावली होती.

मौजे सरसम येथील विद्यमान ग्राम सदस्य तथा माजी सरपंच असलेले सुनील वानखेडे व प.स.उपसभपतिचे पती, व अन्य दलालांचा हा नित्याचाच व्यवसाय असल्याचा आरोप शिवसेनेचे विभाग प्रमुख तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य साईनाथ धोबे यांनी केला. तसेच त्यांच्यावर केवळ थातूर - माथुर कार्यवाही करून चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रयत्न पोलिसांनी न करता यातील मुख्य सूत्रधार शोधून काढण्याची मागणी त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

याबाबत पोलिस निरीक्षक सोनवणे यांच्याशी अन्य आरोपींच्या अटके बाबत माहितीसाठी दूरध्वनीवरून संपर्क केला असता अटक आरोपींना आज न्यलयकदे पाठविले असून, त्यांना पी.सी.आर.ची मागणी करण्यात आली आहे. अन्य आरोपींन अटक करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी