आरोपींना फाशी द्या

डोंगरगाव बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या ..महिला आघाडीची मागणी

हदगाव(शिवाजी देशमुख)अर्धापूर परिसरातील डोंगरगाव शिवारात दलित मुलीवर अत्याचार करणाऱ्या सर्व आरोपींना तत्काळ जेरबंद करा. या घटनेचा निषेध करून त्या आरोपींना फासावर लटकावण्यात यावे अशी मागणी हदगाव शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख सौ.लताताई फाळके पाटील यांनी येथील पोलिस निरीक्षक यांच्या मार्फत एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सदर निवेदनात म्हंटले आहे कि, अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या दलित समाजातील एका अल्पवईन मुलीस बारड पासून जवळच असलेल्या डोंगरगाव येथील माळरानावर नेवून तिच्यावर चार जननी अमानुषपणे सामुहिक बलात्कार केला. त्या घटनेचा हदगाव येथील शिवसेना महिला आघदिअच्य वतीने जाहीरपणे निषेध नोंदविण्यात आला. त्याच बरोबर त्या बलात्कार करणाऱ्या सर्व नराधमाना तातडीने अटका करून फाशीची शिक्षा देण्यात यावी.अन्यथा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा सज्जड इशाराही त्यांनी दिला आहे. या निवेदनावर महिला आघाडीच्या तालुका प्रमुख सौ.लताताई फाळके, प्रितीताई दवणे, सुषमा उदावंत, शीलाताई गंधारे, द्वारकाबाई कांबळे, सुजाता सोनुले, उज्वला नरवाडे, कलावतीबाई, जनाबाई कदम यांच्या स्वाक्षरी आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी