पात्र उमेदवारास डावलले...

आपत्याच्या कारण पुढे करून पात्र उमेदवारास डावलले... 
मुलाखतिची संधी देण्याची मागणी

हिमायतनगर(वार्ताहर)सन २००१ पूर्वीचे आपत्य असताना जाणीवपूर्वक तिसरे आपत्य असल्याचा बहाणा करून इच्छुक उमेदवारास मुलाखातीपासून दूर ठेवल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याबाबतची तक्रार सदर महिलेने जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे करून मुलाखतीसाठी निवड करण्याची मागणी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील सिबदरा ज.येथील अंगणवाडी मदतनीस या पदासाठी शांताबाई कानबा शेळके या महिलेने बालविकास प्रकल्प अधिकारी हिमायतनगर यांच्याकडे रीतशीर प्रस्ताव दाखल केला होता. ऐन मुलाखतीच्या तोंडावर तीन आपत्य असल्याचे कारण समोर करून अर्ज रद्द केला आहे. खरे पाहता शासन निर्णयाप्रमाणे सन २००१ पूर्वीचे आपत्य असलेल्यांना तीन अपत्याचा नियम लागू होत नाही. तरी देखील निवड समिती व प्रकल्प अधिकार्याने मागासवर्गीय असल्याच्या कारणाने जाणीवपूर्वक या पदापासून वंचित ठेवण्याच्या उद्देशाने माझा अर्ज रद्द केला आहे. तसेच मदतनीस या पदासाठी मी सर्व नियम व गुणवत्तेत परिपूर्ण आहे. केवळ स्वार्थापोटी अन्य व्यक्तीची निवड करण्याच्या हेतूने मला डावलून आपला डाव साध्य करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

येथील एका मदतनीस पदाच्या जागेसाठी चार अर्ज आलेले असून, त्यापैकी एकीला २००१ नंतरचे आपत्य असल्याने डावलण्यात आले. तर मला २००१ पूर्वीचे अपत्य असताना जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रयत्न केला आहे. मला असलेल्या तीन अपत्याची प्रत्यक्ष चौकशी करून माझा अर्ज मंजूर करून मदतनीस या पदासाठीच्या मुलाखतीची संधी द्यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी