उपसभपतिसह नऊ जणांवर गुन्हे दाखल

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभपतिसह नऊ जणांवर गुन्हे दाखल


हिमायतनगर(वार्ताहर)सुनेला सतत मारहाण करून मानसिक त्रास दिल्या प्रकरणी हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभपतिसह नऊ जणांवर विवाहितेला मरणास प्रवृत्त केल्याप्रकरणी हिमायतनगर पोलिस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मागील अनेक वर्षापासून मयत विवाहिता सौ.सुरेखा सुरेश पवार हिस सासरच्या लोकांकडून या - ना त्या शुल्लक कारणावरून मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास केला जात होता. हि बाब विवाहितेने माहेरच्यांना सांगितली होती. यावरही विवाहितेच्या नातेवाईकांनी सासरा व पतीस समजावून सांगून मयत विवाहितेस सासरी पाठविले होते. त्यानंतर संसाराचा गाडा चालवीत असताना अचानक दि.२३ रोजी शुल्लक कारणावरून सुरेखास मारहाण करून छळण्यात आले. हे सर्व असह्य झाल्याने सासरच्या लोकांकडून सतत होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने कोणताही विचार न करता गावाजवळील तलाव शेजारी असलेल्या विहिरीत उडी मारून जीवन यात्रा संपविली.  हि बाब माहेरच्यांना लक्षात येताच सुरेखाच्या मृत्यूस कारणीभूत असलेला तिचा पती - सुरेश परसराम पवार, सासरा - कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती परसराम पवार, सासू - शांताबाई परसराम पवार, दीर - सुभाष परसराम पवार, दीर - गोविंद परसराम पवार, दीर  संजय परसराम पवार, जावू - आशाबाई सुभास पवार, जावू - सुरेखाबाई गोविंद पवार, दिलीप पडू राठोड रा.सर्व वायवाडी तांडा ता.हिमायतनगर यांच्या त्रासामुळे विवाहितेने विहिरित उडी घेवून जीवन यात्रा संपविली. अश्या आशयाची तक्रार नातेवाईक किशन सोमाला राठोड, वय ५० वर्ष रा. मखलमा आबूनाईकतांडा , ता. भोकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलिस स्थानकात नऊ जणांवर कलम ४९८(अ), ३०६, ३४ भदवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील चव्हाण हे करीत आहेत.  

  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी