'सुंगध संस्कृतीचा'

ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित 'सुंगध संस्कृतीचा'
कार्यक्रमास रसिकांचा उत्तम प्रतिसाद

नांदेड(अनिल मादसवार)महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा परिषद नांदेड यांच्या सहकार्याने नांदेड येथे तीन दिवसीय 'ग्रंथोत्सव 2014' च्या निमित्त विविध कार्यक्रमांची मेजवाणी देण्यात आली. शेवटच्या दिवशी म्हणजे सांगता समारोह प्रसंगी 'सुगंध संस्कृतीचा' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नांदेडच्या स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतुने याची आखणी करण्यात आली होती. या कार्यक्रमास रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे संयोजक सौ. ज्योती जैन, नृत्य शिरोमणी व लय स्कूल ऑफ परफॉर्मींग आर्टस्चे संचालक भरत जेठवाणी यांचा हा कार्यक्रम भारतीय संस्कृतीला उज्वल करणारा ठरला. कार्यक्रमाची सुरुवात जेठवाणी यांच्या विद्यार्थींनी ईषा जैन व राष्ट्रीय विजेत्या मोहिनी वैजवाडे यांनी नटराज देवतेला वंदन करुन नटरंग उभा या गीतावर भरतनाटयम सादर केले. पुढे लय स्कुलच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, गोंधळ, भारुड सादर करुन रसिकांची वाहवा मिळवली. लय स्कूलचे ट्रेनर शुभम बिरकुरे यांनी सादर केलेल्या मेरी मॉ व काठी घोंघड घेऊ द्या या गितांवर सादर केलेल्या नृत्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. ईषा जैन व मोहिनी वैजवाडे यांनी सादर केलेल्या चला जेजुरीला जाऊ, दुर्गा अंबोरे व साक्षी मनियार यांनी सादर केलेल्या मला इश्काचा गुलकंद खिलवा आणि आम्ही नाही जा, नाद खुळा मा या लावणींनी प्रेक्षकांना ठेका धरायला लावला. याचबरोबर काही पाश्चात्य नृत्य, राजस्थानी, गुजराथी नृत्य पण सादर करण्यात आली. तनया प्रसाद आलुरकर हीने सादर केलेली लावणीही रसिकांच्या कौतुकास पात्र ठरली. सुनो गौर से दुनियावालो, मे मेरा इंडिया या नृत्यांना वेगळया आकर्षण ठरल्या. माँ तुझे सलाम या बहारदार नृत्याने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनल उबाळे हीने केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शूभम बिरकुरे, अमोल काळे, व्यंकटेश काकडे, नईम खान यांनी सहकार्य केले. संयोजक श्रीमती जैन आणि श्री. जेठवाणी यांना प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल रसिक श्रोत्यांनी जिल्हा माहिती कार्यालयाचे विशेष आभार मानले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी