तीन वर्षानंतरहि पेन्शन मिळेना

पेन्शन अभावी मयत शिक्षकाच्या पत्नीवर मजुरीची वेळ..
लेखा विभागातील लालची कारकुनाची करामत

हिमायतनगर(वार्ताहर)मयत शिक्षकाचे मृत्युच्या तीन वर्षानंतरहि पंचायत समितीच्या लेख विभागातील लालची कर्मचार्यामुळे शिक्षकाच्या विधवा पत्नी व मुलांवर उपासमारीची वेळ आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मौजे पवना येथील राजेश्वर गोणारे हे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात विद्यादानाचे काम शिक्षक या पदावरून करत होते. शिक्षणा सारख्या पवित्र क्षेत्रात काम करीत असतांना राजेश्वर गोणारे याचं दि.२९ सप्टेंबर रोजी अल्पश्या आजाराने निधन झाले. त्यांच्या मृत्यू पश्चात कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्याची पत्नी सुलोचना यांच्यावर आली. एक मुलगी व दोन मुले यांच्या शिक्षणाची व उदरनिर्वाहाची, संगोपनाची पूर्णतः जबाबदारी त्यांच्यावर आल्याने कुटुंबाच्या उदर निर्वाहासाठी केवळ शंभर रुपये मिळणाऱ्या शेतातील कामात रोजंदारीवर जावून उदर भरण करावे लागत आहे. पतीच्या निधनानंतर तीन वर्षानंतरही पेन्शन न मिळाल्याने संसाराची आबाळ होत असून, उपवर झालेल्या मुलीचे लग्न खोळंबले आहे. पंचायत समिती कार्यालयाकडे पेन्शनसाठी वारंवार खेटे घालून कार्यालयातील लालची कारकून पवार यांच्याकडे काम होण्यासाठी दोन हजारची लाच देवूनही या ना त्या कारणाने कारकून पवार यांनी पेन्शन बिले काढण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची तक्रार मयत शिक्शक्चि पत्नी सुलोचना यांनी गटशिक्षण अधिकारी यांना दि.१३ रोजी केली आहे.

केवळ पेन्शन अभावी एका शिक्षकाच्या पत्नीवर मोल - मजुरी करून जीवन व्यथित करण्याची वेळ यावी, याच्या पेक्षा शिक्षण विभागासाठी व शासनाच्या कर्मचार्यांसाठी शरमेची गोष्ठ दुसरी असू शकत नाही असा सवाल काही कर्मचार्यांनीच विचारला आहे. तर लालची कारकून पवार यांच्यावर तत्काळ कार्यवाही करून पेन्शन न दिल्यास सहकुटुंब उपोषणास बसणार असल्याचे मयत शिक्षकाची पत्नी सुलोचना राजेश्वर गोणारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी