अखंड हरीनाम सप्ताह

अखंड हरीनाम सप्ताह व कीर्तन सोहळ्यात संगीत रामकथेचे आयोजन

हिमायतनगर(वार्ताहर)प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पोटा बु.येथील हनुमान मंदिरात अखंड हरीनाम सप्ताह व किर्तन सोहळ्यात संगीत रामकथेचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमात पंचक्रोशीतील तमाम रम्भक्तनि उपस्थित राहून कथा श्रावणाचा लाभ घ्यावा असे आवाहन गावकरी मंडळीनी नांदेड न्युज लाईव्हच्या माध्यमातून केले आहे.

माघ कृ.०६ दि. २१ फेब्रुवारी ते माघ कृ.२८ फेब्रुवारी या काळात ह.भ.प.बाबू महाराज आंदेगावकर यांच्या मधुर वाणीतून रामकथेचे संगीत भावार्थ रुपात प्रवचन होणार आहे. त्यास हभप.दत्त महाराज आंदेगावकर हे संगीत संयोजन करणार असून, कोरस ज्ञानेश्वर बोड्डेवार सिबदरा, तबलावादक सदाशिव अरगुलवार, झाकी रामजी महाराज काईतवाड हे साथ सांगत देणार आहेत. ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ हभप.मधुकर महाराज पोटेकर तर हरिपाठाचे व्यासपीठ हभप.विनायक महाराज आळंदीकर हे सांभाळणार आहेत. तसेच सप्ताह दरम्यान दररोज सकाळी ४ ते ६ या वेळेत काकडा भजन, सकाळी ६ ते १० ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी १० ते १२ गाथा पारायण, दुपारी १ ते ४ संगीत रामकथा, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत कीर्तनकार हभप.लक्ष्मण महाराज आळंदीकर (बलकीर्तनकार), हभप.भीमराव महाराज आळंदीकर(गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त दु.११ ते ०१ व रात्री हभप. व्यंकटेश महाराज कामारीकर (भागवताचार्य), हभप. मधुकर महाराज सायाळकर पालम (विनोदाचार्य), हभप. शिवाजी महाराज वटबें श्रीक्षेत्र आळंदी(रामायनचार्य), हभप.माधव महाराज बोरगडीकर, हभप. संदीपान महाराज शिंदे बारामती पुणे, हभप. भुजंग महाराज देवकीनंदन कांकांडी (गोआश्रम) दुपारी ११ ते ०१ व रात्री हभप. ब्रम्हनिष्ठ भास्कर महाराज सांडोकार उदगीर, तसेच सप्तह्च्य शेवटच्या दिवशी हभप. ब्रम्हनिष्ठ भास्कर महाराज सांडोकार यांचे काल्याचे किर्तन दुपारी ११ ते ०१ या वेळेत होणार आहे. दि.२७ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाची दिंडी गावातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात येणार आहे. त्यानंतर दि. २८ रोजी भव्य महाप्रसादाने सप्ताहाची सांगता केली जाणार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी