शिवसैनिक दाखविणार काळे झंडे

कामारी तंटामुक्त भवन उद्घाटनासाठी येणाऱ्या आ. माधवराव पाटील, तानाजी चिखले यांना
खासदार समर्थक शिवसैनिक दाखविणार काळे झंडे

हिमायतनगर(वार्ताहर)महात्मा गांधी तंटामुक्त योजनेच्या निधीतून कामारी येथे बांधकाम करण्यात आलेल्या तंटा भवन उद्घाटनाच्या कोनशिलेवर खा.सुभाष वानखेडे यांचे नाव न टाकल्याने शिवसैनिक आक्रमक झाले असून, उद्घाटनासाठी येणाऱ्या हदगाव - हिमायतनगर तालुक्याच्या आमदारांसह सर्व मान्यवरांना शिवसैनिक काळे झंडे दाखवून निषेध करणार असल्याचे निवेदन दिले आहे.

मागील काळात तंटामुक्त योजनेत चांगले कार्य केल्यामुळे गावातील विकास कार्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सर्वात मोठे म्हणजे ०७ लाख रुपयाचे बक्षीस गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या हस्ते नांदेड येथील भव्य दिव्य अश्या कार्यक्रमात देण्यात आले होते. या निधीचा विनियोग चांगल्या कामासाठी व्हावा असा शासनाचा उद्देश आहे. परंतु येथील पोलिस पाटील यांनी नातेवाईकांच्या संगनमताने स्वतःच तंटा मुक्त भवनाच्या इमारतीचे बांधकाम केले. त्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन दि.११ मंगळवार रोजी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. परंतु या उद्घाटनासाठी तथा अनावरण केल्या जाणार्या कोनशिलेवर तालुक्याचे आ.माधवराव पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, प्रा.संतोष देवराये, आर.जी.शिरफ़ुले, भीमराव देवराये, आदींची नावे टाकण्यात आली आहेत. परंतु याच तालुक्याचे १५ वर्ष विधानसभेवर नेतृत्व करणारे माजी आमदार तथा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खा.सुभाष वानखेडे यांचे नाव जाणीवपूर्वक न टाकताच, गावाच्या शांततेचि हमी देवून तंटे मिटविण्यात सहभागी होणाऱ्या पोलिस पाटलाने गावात राजकारण करीत एकप्रकारे तंटा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे शासनाच्या उद्देशाला तडा गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

या प्रकरणावरून गावात राजकीय वातावरण तापले असून, तंटा मुक्त भवनाच्या उद्घाटनासाठी येणाऱ्या सर्व मान्यवरांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झंडे दाखविण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी धीरजकुमार, पोलिस अधीक्षक विठ्ठल जाधव यांना दिला आहे. या निवेदनावर शिवसैनिक पांडुरंग निवृत्तीराव शिरफ़ुले, रमेश मधुकर शिरफ़ुले, प्रदीपराव नागोराव शिरफ़ुले, गणेश शिरफ़ुले, प्रमोद शिरफ़ुले यांच्यासह अनेक शिवसैनिकांच्या स्वाक्षर्या आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी