आमरण उपोषण

तुटपुंजी मदत देवून पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली...
प्रजासत्ताक दिनापासून शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरु..

हिमायतनगर(अनिल मादसवार)जुलै - ऑगस्ट २०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने संपूर्ण शेतीचे नुकसान झालेले बहुतांश शेतकरी अनुदानापासून वंचित असून, मदत मिळणारयाना सुद्धा तुटपुंजी मदत देवून शासनाकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्या गेली आहेत. शासनाकडून शेतकऱ्यांची केली जात असलेल्या फसवणुकीच्या विरोधात कामारी येथील शेतकर्यांनी तहसील कार्यालयासमोर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषण सुरु केले आहे.

विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या हिमायतनगर तालुक्यात सन २०१३ च्या खरीप हंगामात मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे पैनगंगा नदीला तीन वेळा पूर आला असून, या पुराचे पाणी नदीकाठावरील गावात व शेतीत शिरल्याने शेतकऱ्यांच्या शेतजमिनीसह पिके पूर्णतः खरडून गेलि होती. याबाबतचे वृत्त वर्तमान पत्रातून सातत्याने प्रकाशित होताच, दखल घेवून राज्याचे मन्र्त्यसह स्थनिक्च्य माजी मंत्री, खासदार, आमदार यांनी अधिकाऱ्यांसह संबंधित बुडीत क्षेत्राची पाहणी केली. तसेच पिकांचे पूर्णतः नुकसानीपोटी हेक्टरी २५ हजार रुपये, तर अंशतः नुकसानीपोटी हेक्टरी ५ हजार रुपये मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच मदतीमध्ये २ हेक्टर जमिनीची मर्यादा ठेवून मदत जाहीर सुद्धा केली. त्याप्रमाणे संबंधित सज्जाचे तलाठी यांना शेतकऱ्यांचा नुकसान क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले, तालुक्याला भरीव मदतही मिळाली. परंतु पिकांचे झालेल्या नुकसानी प्रमाणे मदत न देत अत्यंत तुटपुंजी मदत देवून शासनाकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला गेला आहे. या निषेधार्थ कामारी येथील शेतकर्यांनी तहसील कार्यालयास आठ दिवसापूर्वी निएवदन देवून २४ पर्यंत नुकसानग्रस्त शेतकर्यांना मोबदला देण्याची मागणी करून, २६ जानेवारीपासून उपोषण सुरु करण्याचा इशारा दिला होता. परंतु संबंधितानी शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे येथील शेतकर्यांना अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागला आहे. प्रजासत्ताक दिनापासून शेतकरी श्री उत्तमराव चुकारे, विनायकराव देवराये, प्रकाश चुकारे, शंकर शिरफ़ुले, संतोष देवराये, गणेश देवराये, ददरवे देवराये, दिलीप देवार्ये, नारायण शिरफ़ुले, धोंडू बारडकर यांच्यासह अनेक शेतकर्यांनी उपोषण सुरु केले आहे. वृत्त लिहीपर्यंत एकही अधिकारी व पदाधिकार्यांनी साधी भेट देवून विचारपूसही केली नसल्याची खंत उपोशनग्रस्त शेतकर्यांनी नांदेड न्युज लाइव्ह्चे संपादक अनिल मादसवार, पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष कानबा पोपलवार, दिलीप शिंदे, शे.इस्माईल, धम्म मुनेश्वर आदी पत्रकारांसमोर व्यक्त केली.

स्वार्थापोटी खोत सर्वे करणार्यांवर कार्यवाही करा...
---------------------------------------------------

शासन स्तरावरून सर्वेचे आदेश देण्यात आल्यानंतर काही तलाठी महाशयांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक जमवा - जमाव करत नुकसानीचे पंचनामे केले. परिणामी प्रत्यक्षात नुकसान झालेल्या क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र दाखवून खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवले असल्याचा आरोप भेट दिलेल्या काही शेतकर्यांनी करून अश्या लालची तलाठ्याने केलेल्या सर्वेचि चौकशी करून शेतकर्यांना वंचित ठेवल्याप्रकरणी निलंबित करावे आणि नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे मोबदला मिळून द्यावा अशी मागणी केली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी