सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक थोर महात्म्यांचे बलिदान...भास्कर दुसे  



हिमायतनगर(वार्ताहर)देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक थोर महात्म्यांनी बलिदान दिले. स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधीजीनी उपसलेले शस्त्र हे अहिंसात्मक होते.. ते परकीय शत्रूच्या तावडीतून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यास पुरेसे नव्हते. त्यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी " तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दुंगा " असा नारा देत आजाद हिंद सेनेची स्थापना करून आपल्या प्राणाची आहुती देवून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. ज्या ज्या वेळी अन्याय अत्याचार वाढला त्यावेळी अश्या महान पुरुषांनी जन्म घेतला. असे मत जेष्ठ पत्रकार श्री भास्कर दुसे यांनी व्यक्त केले. ते हिमायतनगर येथील राजा भगीरथ विद्यालयात आयोजित नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ११६ व्या जयंती कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी मंचावर माजी सैनिक बी.के.राऊत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे ग्राम पंचायत प्रतिनिधी सुभाष शिंदे, नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे सुपरवायजर श्रीमती झाडे, दिक्कतवार, बी.आर.पवार, सौ.माधुरी तीप्पणवार, सौ उत्तरवार, कोंडामंगलसर, हुजपाचे शिरफ़ुलेसर, श्री कापसे सर, यांची उपस्थिती होती. 

कार्यक्रमच्या सुरुवातीला नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येवून मान्यवरांनी अभिवादन केले. सत्कार समारंभ तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांना शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, शालेय जीवनात विद्यार्थ्यांना शिकविले जाणारे अभ्यासक्रम केवळ माहितीचा खजिना आहे. परंतु यातून विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळत नाही, त्यासाठी अखिल भारतीय मुस्लिम सेना या सामाजिक संघटनेच्या शे.इस्माईल यांनी आयोजित केलेली क्रांतीकारकाची हि जयंती विद्यार्थ्यांना स्फूर्ती देणारी ठरली आहे. आजच्या नव्या पिढीला नवा इतिहास मिळत आहे, परंतु नवा इतिहास न देता पिढीजात जुन्या क्रांती कारकांचा इतिहास देणे गरजेचे आहे. तरच आगामी काळात अश्या क्रांतीकाराचा जन्म होईल, त्यासाठी विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या इतिहासाचा अभ्यास करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी आयोजित रांगोळी स्पर्धा व भाषण स्पर्धेत सहभागी होवून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारी भाषणे केलेल्या विद्यार्थी - विद्यर्थिनिना बक्षीस वितरण करण्यात आले. भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक शीतल चलमेलवार, द्वितीय क्रमांक प्रेम पिंगळे, तृतीय क्रमांक वैष्णवी उत्तरवार हिने पटकावला. तर रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रियांका मांगुळकर, द्वितीय क्रमांक श्रद्धा कोमावार, तृतीय क्रमांक निकिता दिक्कतवार हिने मिळविला आहे. भाषण स्पर्धा परीक्षकाचे कार्य बाचावार सर, आलेवाद सर यांनी केले. जयंती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शे.इस्माईल, धम्मपाल मुनेश्वर, शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रेमकुमार धर्माधिकारी यांनी केले.    

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी