जिद्द चिकाटीने कार्य

जिद्द चिकाटीने कार्य करून अस्तित्व निर्माण करा...रेणुका तम्मलवार



हिमायतनगर(अनिल मादसवार)देश २१ व्या शतकात पावूल ठेवत असताना विद्यार्थी दशेमध्ये असून, मोठ मोठ्या स्पर्धात्मक युगात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या युवक - युवतींना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. परिणामी अनेक विद्यार्थी अर्धवट शिक्षण घेवून सोडल्याचे चित्र बघावयास मिळत आहेत. परंतु या सर्व अडचणीचा सामना करीत विद्यार्थ्यांनी जिद्द - चिकाटीने कार्य करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे लागेल असे मत जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र नांदेडच्या सहाय्यक संचालक सौ रेणुका तम्मलवार यांनी व्यक्त केले. त्या हिमायतनगर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना टुलकिट व प्रमाणपत्र वितरण सोहळ्याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

यावेळी मंचावर  जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शनकेंद्र नांदेडचे वरिष्ठ सहाय्यक एल.एम.लोकडे, लोकल एक्सपर्ट श्री पालवेसर, प.स.चे दासरवाड, सरपंच गंगाबाई शिंदे, नांदेड न्युज लाइव्ह्चे संपादक अनिल मादसवार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री.एम.एस.बिरादार, गंगाधर मामीडवार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व स्वागत गीताने करण्यात आली. त्यानंतर स्वागत समारंभ कार्यक्रम संपन्न होवून मानव विकास मिशन अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना कौशल्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम्पुटर, बेसिक इलेक्ट्रिक, आदी ट्रेडचे गतवर्षीच्या अभ्यासक्रमात यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २०० विद्यार्थांना टुलकिट व प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, शासनाच्या वतीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात प्रगतीचे दालन खुले आहेत. त्यामुळे शिक्षण घेवून नौकरीच्या मागे न लागता प्रशिक्षणात मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग घेवून मोठे उद्योजक बनून देशाच्या विकासाला हाथभार लावावा. ग्रामीण भागातील युवकांचा समाज आहे कि, बेकारी वाढलीय, परंतु हि बाब चुकीची आहे, उद्योगीक क्षेतार महिन्याला ५०० ची व्हैकन्सी असते, परंतु ग्रामीण भागातील युवकांची इच्छा काम करण्याची नसते. तसेच श्रीमंतांचीच मुले नौकरीला लागतात असा गैरसमज तथा  व्यक्तिमत्व विकासाच्या अभावामुळे ग्रामीण भागातील युवकांची पीछेहाट होत आहे. या बाबीला दूर सारून अगोदर आपल्या विकासाचे धेय्य ठरवा, त्यानंतर उच्च पदस्त झालेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेवून ते पूर्ण करा. पुस्तकांचे वाचन, सामाजिक माहिती, स्पर्धा परीक्षा, आदींसह आपली वर्तणूक व आई वडिलांसह गुरुजनांचा आदर राखून मानाने व संस्काराने श्रीमंत व्हा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना " तू दिसतेस छान .. कोण कशाला म्हणायला हवे..., आपण आहोतच छान..हे आपले आपल्यालाच कळायला हवे... हि सुंदर कविता म्हणून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी सौ.लखमावाड मैडम, पत्रकार प्रेमकुमार धर्माधिकारी, धम्मपाल मुनेश्वर, संजय कवडे, जांबुवंत मिराशे, संजय मुनेश्वर आदींसह शेकडो विद्यार्थी, विद्यार्थिनींची उपस्थिती होती.

हिमायतनगर येथे सन २००८ पासून औद्योगिक प्रशिक्षण संस्था अस्तित्वात आली आहे,  तेंव्हापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचा लाभ मिळत आहे. सध्या स्थितीत पळसपूर रस्त्यावर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची भव्य दिव्य इमारतीचे काम सुरु आहे. लवकरच काम पूर्णत्वास जाईल, त्या ठिकाणी ८ ट्रेड व १६ उनीत चालू होणारा आहेत. तेंव्हा मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळून स्वयंरोजगाराच्या संधीचे द्वार खुलतील अशी माहिती प्राचार्य स्रो बिरादार यांनी प्रास्ताविक भाषणात दिली. कार्यक्रमाचे सुरेख असे सुत्रसंचलन एम.एस.शेख यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री बिरादार यांनी मानले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी