प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिनांचा 64 वा वर्धापन दिन समारंभ



नांदेड(अनिल मादसवार)भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 64 वा वर्धापन दिन समारंभ दि. 26 जानेवारी 2014 रोजी शासकीय ध्वजारोहनाचा समारंभ पालकमंत्री डी.पी. सावंत यांच्या शुभहस्ते श्री. गुरुगोविंद सिंघजी स्टेडियम नांदेड येथे सकाळी 9.15 वा होणार आहे.

त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी नांदेड यांनी पुर्वतयारीच्या बैठकीत दिलेल्या सुचनेनुसार राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक क्र. एफएलजी-1091/3/दि. 20 मार्च 1991 तसेच क्र. एफएलजी-1091 (2)/30 दि. 5/12/1991 ध्वजसंहितेतील सूचनेचे अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे पालन करावे.

राष्टध्वजाच्या वापराबाबत महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक दि. 26 मार्च 2013, 26 एप्रिल 2013, 22 ऑगस्ट 2007 परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये तसेच राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी.

ध्वजारोहणाच्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना पालकमंत्री यांचे हस्ते पुरस्कार द्यावयाचा अशा विद्यार्थ्यांची नावे दि. 20 जानेवारी 2014 पर्यंत आणि ज्या विभागाकडून सदर दिनी चित्ररथाचे संचलन करावयाचे आहे त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे सादरीकरणासाठी नावे नोंदविण्यात यावीत असे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.

शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश
--------------------------------

जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून नांदेडचे अपर जिल्हादंडाधिकारी डॉ. निशिकांत देशपांडे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्राप्त अधिकारानुसार नांदेड जिल्ह्यात 14 जानेवारी 2014 पासून ते 28 जानेवारी 2014 च्या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी