हिमायतनगर केलेल्या वक्तव्यापासून घुमजाव

केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवारांनी घेतलेला निर्णय मला मान्य - सूर्यकांता पाटील
हिमायतनगर केलेल्या वक्तव्यापासून घुमजाव

नांदेड(अनिल मादसवार)राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार हे आमचे नेते आहेत. ते पक्षाचे अध्यक्षही आहेत. त्यांचा शब्द मी अंतीम मानीन. पक्षाने घेतलेला निर्णय मला मान्य राहील.पक्ष मोठा आहे. असे मी मानले. त्याच प्रमाणे आपली यापुढची राजकीय वाटचाल राहील. असे घुमजाव माजी केंद्रीय ग्रामीण विकास राज्य मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या श्रीमती सूर्यकांता पाटील यांनी बुधवारी (दि.२९) येथे केलेआहे . कैलासनगरातील प्रियदर्शनी निवासस्थानी पत्रकारांना ही माहिती दिली.

लोकसभा निवडणुकीचे २०१४ मिशन सध्याची परिस्थिती आणि आपली भूमिका मांडतांना त्यांनी हे सविस्त मत व्यक्त केले. परवा अशोक चव्हान यांनी कांग्रेस कार्यकर्त्यांच्या मेलाव्यात हिंगोली मतदार संघातील कांग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार राजीव सातव यांच्या उपस्थितीत, लातूर ,नांदेड ,हिंगोली या तिन्हीही जागा जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणणार असा निर्धार व्यक्त करीत .ही जागा राष्ट्रवादी ऐवजी कान्ग्रेस पक्षाल सुटणार असे संकेत दिले होते.त्यामुळे अस्वस्थ झालेल्या सूर्यकांता पाटील यांनी काल हिमायतनगर यथे एका कार्यक्रमात त्यानी पक्षाने तिकीट दिले नाही तर हिंगोली लोकसभा मतदार संघातून अपक्ष जागा लढविणार असे जाहीर केले होते. त्याचे पडसाद सर्वत्र उमटले होते.

काहीनी याच्या तक्रारी पक्षश्रेष्ठीकडे केल्या होत्या त्यामुळे आज घुमजाव करीत त्या म्हणाल्या ,की, गेल्या ३ दशका पासून मी राजकारणात काम केले. अनेक चढउतार पाहिले. अडचणींवर मात केली. परंत डगमगली नाही.केंद्रात राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला शरद पवार यांनी दिली. ही बाब मी कधीही विसरू शकणार नाही. पक्षाचा आदेश मी सर्वोच्च मानते. त्यामुळे शरद पवार साहेब जो आदेश देतील तो मला मान्य राहील.संघ हा राष्ट्रवादी कॉंगे्रसच्या वाट्याला आलेली जागा आहे. हा मतदार संघ माझी कर्मभूमी आहे. येथून मी लोकसभेसाठी प्रतिनिधित्व केले. मागे माझी बदली नांदेड लोकसभा मतदार संघात करण्यात आली होती. तेथूनही मी विजयी झाले. केशवराव धोंडगेंना मिळालेल्या मताधिक्याप्रमाणे मला मताधिक्य मिळाले. पुन्हा माझी बदली माझ्या परंपरागत हिंगोली लोकसभा मतदार संघात करण्यात आली. तिथूनही मी विजयी झाले. या मतदार संघातला खडा न खडा समस्या आणि असलेली आव्हाने याची मला माहिती आहे. या मतदार संघात ब्रॉडगेज रेल्वे मी नेली. त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला. त्यामुळे मतदारांचा माझ्यावर मोठा विश्‍वास आहे.

कॉंग्रेस पक्ष हा आमचा मित्र पक्ष आहे. मित्र पक्षाने तो धर्म जपणूक करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे. राजीव सातवांचा आग्रह त्यांच्या पक्षाकडून केल्या जात आहे. कोणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. परंतु माझ्या अनुभवानुसार मी पक्षाच्या विरोधात जाऊन लढणार नाही. पक्ष जे आदेश देईल तो शिरसावंध्य मानीन. पैशावर मी कधीही राजकारण केले नाही. व मी कधी करणारही नाही. तो माझा स्वभावही नाही. नवी दिल्लीच्या विधानसभेत राजकीय परिवर्तन झाले. आपचा बराच गाजावाजा झाला. परंतु मी खरी जुनी आपवाली आहे. हिंगोलीतून कॉंग्रेसने जागा मागणे हा त्यांचा अधिकार आहे. जो काय अंतिम निर्णय घेतील तो शरद पवार घेतील. परंतु हिंगोलीतून माझ्या ऐवजी इतरांचा विचार केला तर युपीएची एक जागा हातची जाईल. १९९९ पासून हिंगोली लोकसभा मतदार संघ मी मोठ्या महत्तप्रयासाने बांधला आहे. हिंगोलीची जिल्हा परिषद आमची आहे. नगरपालिका व अन्य ठिकाणी राष्ट्रवादीचे संख्याबळ आहे. वसमत आणि किनवटला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत. हे माझे खरे बळ आहे. गेल्या निवडणुकीत मी पराभूत झाले. शिवसेनेचे सुभाष वानखेडे निवडून आले. परंतु वानखेडेंचा गेल्या पाच वर्षाचा अनुभव चांगला नाही. ही प्रतिक्रिया मतदारांची आहे. माझ्यावर मतदारांचे मोठे प्रेम आहे. त्यामुळे मतदार मागची चुक यावेळी करणार नाही. सोळाव्या लोकसभेसाठी सबंध देशात वातावरण ढवळून निघत आहे.

नरेंद्र मोदींची हवा नाही. शिवसेनेचीही हवा नाही. सीबीआय, सीआयडी यांनी या बाबत जरुर चौकशी करावी. कॉंग्रेस व मित्र पक्षाचे युपीए सरकार हे स्थिर सरकार असून देशाला तारणारे आहे. देशातल्या चार राज्याचा मतदारांचा कौल म्हणजे सबंध देशाचा कौल नव्हे. हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी करून निवडणूक लढविण्याचा माझा कोणताही इरादा नाही अथवा तसा माझा पूर्व इतिहासही नाही. मी एकेकाळी कॉंग्रेसमध्ये होते. आता राष्ट्रवादीत आहे. या पक्षाच्या सांसदीय मंडळावरही आहे. राजकारणाचा मला दिर्घ अनुभव आहे. आणि ही माझी शिदोरी मी महत्वाची मानते. मतदार संघ मराठवाडा विभाग, महाराष्ट्र व सबंध देश यांच्या प्रश्‍नाची मला संपूर्ण माहिती आहे. नांदेडला नुकताच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकाराने कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याच्या बातम्या कुणी कशा दिल्या या खोलात मी जात नाही. परंतु आघाडीचा धर्म पाळू असे खुद्द अशोकराव चव्हाण म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या एकसुरी भाषणाला कंटाळले आहेत.

दूरचित्रवाणीवर त्यांचे भाषण सुरू झाले की लोक आता आपोआप टीव्हीच बंद करीत आहेत. भारतीय जनता पक्षाने गेल्या २ वर्षापासून संघटीतरित्या सेटींग केली आहे. परंतु मतदारांवर त्याचा परिणाम होणार नाही. ५४३ एकूण जागा पैकी १८० पर्यंत भाजप जाईल असे काहीचे अनुमान असले तरी त्यावर माझा विश्‍वास बसत नाही. जय ललिता व अन्य नेत्या आपापले गड राखून आहेत. उत्तरेत जात चालते पैसा चालत नाही. हरियाणा व पंजाबात सुद्धा जात चालते त्यामुळे भाजपचा तर्क एकांगी स्वरुपाचा आहे. अशोकराव चव्हाणांनी संकट काळात मेळावा घेणे चुकीचे नाही. त्यांच्या घरात ६० वर्षे सत्ता आहे. अशोकरावांनी नांदेड मधून लोकसभा लढवावी. तर त्यांना यश मिळू शकेल. विद्यमान खासदाराबद्दल मी बोलू इच्छित नाही. डी.पी. सावंत तर कोकणातून इथे आले आहेत. नशीबाने आमदार व नशीबाने राज्यमंत्रीपद त्यांना मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या युद्धात स्वतः अशोकराव उतरले तर नांदेडची जागा कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यात राहू शकेल. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे नुकतेच नांदेड, परभणी भागात येऊन गेले. राजकारणातला हा नवा छोकरा आहे. त्याला अजून म्यानातून तलवारही काढता येत नाही. माझ्या वसमत भागात हा छोकरा फिरला. त्याच्या आगेमागे ४०० पोरं फिरत होती. याच काळात माझ्या किनवट व हदगावला सभा झाल्या. देशात कोणतीही लाट असली तरी आमचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अजून अभेद्य आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघात ६८ टक्के मराठा समाजाचे मतदार असून हे परंपरागत मतदार काम करणारा उमेदवार कोण हे चांगले जाणून आहेत. मला तिकीट मिळाले नाही तर राजकीय भडका उडू शकेल असे भाकीत व्यक्त करून सुभाष वानखेडे यांना पक्षांतर्गत बंडाला सामोरे जावे लागणार आहे. वसमत व कळमनुरी भागात वानखेडेंना त्यांच्या पक्षातल्या अंतर्गत विरोधकांना सामोरे जावे लागणार आहे. विकासाचे प्रश्‍न समोर करून आपण पक्षाने आदेश दिला तरच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू गेल्या पाच वर्षात निवडणुकीतल्या पराभवामुळे नाउमेद न होता आपण मतदारांशी सतत संपर्क ठेवला आहे. आणि हेच आपले मुख्य भांडवल आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी